Stormy winds hit Osmanabad city again
Stormy winds hit Osmanabad city again 
मुख्य बातम्या

उस्मानाबाद शहराला पुन्हा वादळी वाऱ्याचा तडाखा 

टीम अॅग्रोवन

उस्मानाबाद : तीन दिवसांच्या खंडानंतर उस्मानाबाद शहराला रविवारी (ता. १९) पहाटे पुन्हा वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. नेहमीप्रमाणे वादळी वाऱ्यानंतर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. सुमारे पाऊणतास विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. तर तालुक्यातील पळसप येथे वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

शहरात बुधवारी (ता. १५) सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. विजेचा कडकडाट तेवढाच होता. त्यानंतर रविवारी (ता. १९) पहाटे पुन्हा एकदा तशाच वादळी वाऱ्याने शहराला तडाखा दिला. पहाटे दीडच्या सुमारास शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने शहरातील झाडे हेलकावे खात होती. अगदी दहा मिनिटांतच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यात पुन्हा विजेचा कडकडाट सुरू झाला. साखर झोपेत असलेल्या शहरवासीयांना ढगांच्या गडगडाटाने जाग केले. त्यात वीज गायब झाली तर सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला.  पळसपला पत्रे उडाली  तालुक्यातील पळसप येथे पहाटे झालेल्या वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. रात्रीच्या वेळेला असा प्रकार झाल्याने नागरिकांना इतरत्र स्थलांतरित व्हावे लागले. प्रशासन स्तरावर त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जीवनावश्यक वस्तू, धान्य पावसात भिजले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

झाड उन्मळून पडल्याने ४ शेळ्यांचा मृत्यू  तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी येथे गारपिट, वादळी वाऱ्यासह शनिवारी (ता. १८) सायंकाळी चारच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळून वीजताराही तुटल्या. झाड उन्मळून पडल्याने त्याखाली अडकून चार शेळ्यांचा मृत्यू झाला. सहा शेळ्यांना वाचविण्यात यश आले. दरम्यान, तालुक्यातील तामलवाडी, माळुंब्रा भागातही सायंकाळच्या सुमारास काही मिनिटे अवकाळी पाऊस झाला. 

शेळ्या पुढे होत्या, मी पाठीमागे होतो, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने झाड पडले. माझ्या चार शेळ्यांचा मृत्यू झाला. सहा शेळ्या शेजारील काही शेतकऱ्यांनी वाचविल्या.  - बावालाल शेख, बिजनवाडी. 

पशुपालक बावालाल शेख याच्या शेळ्या मृत झाल्याबाबत पंचनामा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.  - सौदागर तांदळे, तहसीलदार, तुळजापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT