पुढील आठवडा वादळी पावसाचा
पुढील आठवडा वादळी पावसाचा 
मुख्य बातम्या

पुढील आठवडा वादळी पावसाचा

टीम अॅग्रोवन

पुणे  : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) यंदाच्या हंगामात दमदार पाऊस कोसळला. राज्यात सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. यातच राज्यात मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला असताना उद्यापासून (ता. ४) पावसाला पोषक हवामान होत आहे. पुढील आठवड्यात राज्यातील विविध भागांत वादळी पावसाची शक्यता आहे. या काळात मेघगर्जना, विजांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.   

हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, की मॉन्सूनने अद्याप परतीचा प्रवास सुरू केलेला नाही. महाराष्ट्रातूनही साधारणत: १५ तारखेनंतरच मॉन्सून माघारी फिरण्यास सुरवात होईल. दरम्यानच्या काळात ४ ते ८ या कालावधीमध्ये राज्यात वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणाच्या दक्षिण भागात चांगला पाऊस अपेक्षित असून, उर्वरित महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळतील. तसेच काही ठिकाणी कमी काळात जोरदार पावसाच्या सरी येतील. तसेच १५ तारखेपर्यंतदेखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पाऊस कमी होणार असला तरी आठवडाभर (२२ ऑक्टोबरपर्यंत) पश्‍चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता असल्याचे डॉ. कश्यपी यांनी सांगितले. 

हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव म्हणाले, की ६ आॅक्टोबरच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आल्याने सोमवारपासून (ता. ७) ते शनिवारपर्यंत (ता. १२) महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. यातही बुधवारी (ता. ९) आणि गुरुवारी (ता. १०) पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असल्याचे डॉ. श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.  दरम्यान राज्यात भात, मका, सोयाबीन, कापसासह खरिपाची पिके परिपक्व होण्याच्या स्थितीत आहेत. राज्यातील वादळी पावसाची शक्यता विचारात घेता, मोठे नुकसान होण्याची भीती असल्याने काढणीस आलेल्या, साठवून ठेवलेल्या शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT