पाणलोटची कामे
पाणलोटची कामे  
मुख्य बातम्या

पाणलोट गैरव्यवहाराबाबत आयुक्तालयात वादळी बैठक

टीम अॅग्रोवन

पुणे : उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या पाणलोट घोटाळ्याच्या रखडलेल्या चौकशीचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्तालयात वादळी बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘‘चौकशी करण्याची प्रशासनाची तयारी आहे,’’ अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे.  पाणलोटातील गैरव्यवहाराबाबत शेतकरी गोविंद देशपांडे यांनी गंभीर स्वरूपाचे मुद्दे उपस्थित केले होते. त्यामुळे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्या दालनातच संबंधित शेतकरी व अधिकारी वर्गाला समोरासमोर बसवून मुद्दे उपस्थित करण्यास परवानगी दिली. ‘‘कोणतीही चौकशी प्रलंबित ठेवली जाणार नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात कोणत्या मुद्द्यांवर चौकशी करायची व त्याचे स्वरूप कसे असेल याचा निर्णय घेतला जाईल,’’ असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. ‘‘पाणलोट घोटाळ्यात कृषी खात्याने शासनाची दिशाभूल केली आहे. राज्यातील पाणलोट समित्यांच्या रचनेबाबत मी गंभीर आक्षेप नोंदविले. समित्यांच्या सचिवांची बेकायदेशीर नेमणूक करणे, कोरे चेक घेणे, खासगी बॅंकेत खाते काढून रकमा वळविणे, लक्षावधीच्या रकमा हडपणे, कृषी आस्थापना विभागाने दोषी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणे, असे प्रकार सातत्याने झाले आहेत. या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी झाल्यास २०० कोटींचा घोटाळा उघड होऊ शकतो. पण तक्रार घेऊन एखादा शेतकरी पुढे आलाच तर अधिकारी वर्ग त्याला पद्धतशीरपणे बदनाम करून चौकशी हाणून पाडतात,’’ असेही स्पष्ट मत श्री. देशपांडे यांनी मांडले.  पाणलोट घोटाळ्याबाबत श्री. देशपांडे यांनी संतप्त भावना मांडल्या आहेत. कृषी खात्यातील काही प्रकरणांबाबत कारवाई न करता उलट तक्रारदार शेतकऱ्यांनाच बदनाम केले जात आहे. माझ्या तक्रारीची फेकाफेक केली जात असून, मला न्याय न मिळाल्यास दिल्लीत उपोषणाला बसण्याची माझी तयारी आहे, असा इशारा या शेतकऱ्याने बैठकीत दिला.  चूक असल्यास शिक्षा द्या राज्यातील पाणलोट समित्यांच्या बेकायदेशीर रचनेतून शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे. त्यामुळे कृषी खात्याची प्रतिमा डागाळत असून, दोषींवर कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या नावाखाली काही अधिकारी घोटाळे करतात. काही जण पाकिटमाराचे दरोडेखोर झाले आहेत. मी घोटाळ्याचे पुरावे दिले; पण भ्रष्ट यंत्रणा एकमेकांना पाठिशी घालते आहे. जर माझे मुद्दे चुकीचे निघाल्यास मला शिक्षा द्या, अशी संतप्त भावना श्री. देशपांडे यांनी मांडली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT