The storm headed towards the Arabian Sea
The storm headed towards the Arabian Sea 
मुख्य बातम्या

वादळ अरबी समुद्राच्या दिशेने

टीम अॅग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागरात घोंघावणारे ‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी (ता. २६) आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले. या चक्रीवादळाची तीव्रता ओसरत असून, ही वादळी प्रणाली महाराष्ट्राकडे येत आहे. महाराष्ट्र पार करून अरबी समुद्राकडे गेल्यानंतर गुरुवारपर्यंत (ता. ३०) ही प्रणाली पुन्हा तीव्र होण्याचे संकेत आहेत. 

बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता. २५) रात्री ‘गुलाब’ चक्रीवादळाची  निर्मिती झाली. रविवारी सायंकाळी चक्रीवादळ ओडिशाच्या गोपाळपूर, आंध्र प्रदेशच्या कलिंगापट्टणम दरम्यान धडकले. 

त्यानंतर या वादळाची तीव्रता कमी होत असून, सोमवारी दुपारी ही प्रणालीचे केंद्र छत्तीसगडमधील जगदलपूर पासून आग्नेय दिशेला ९० किलोमीटर तर ओडिशाच्या मलकंगिरीपासून ईशान्येकडे ६५ किलोमीटर अंतरावर होती. रात्री या प्रणालीचे अतितीव्र कमी दाब क्षेत्रात (डिप्रेशन) रुपांतर होणार असून, ती पश्चिमेकडे महाराष्ट्राकडे सरकणार आहे.

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस सतर्कतेचा वादळी प्रणालीची तीव्रता ओसरत असली तरी, तिचा प्रभाव आज (ता. २८) महाराष्ट्रात जाणवणार आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा, पश्चिम विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या महाराष्ट्रासाठी आजचा दिवस सतर्कतेचा ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT