पीक विमा परताव्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
पीक विमा परताव्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या 
मुख्य बातम्या

पीक विमा परताव्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

टीम अॅग्रोवन

परभणीः गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबद्दल संपूर्ण जोखमीसह विमा परतावा मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. ४) करण्यात आलेल्या सर्वपक्षीय ठिय्या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. ५) जिल्हा बंद आंदोलन करण्यात येणार आहे, असे खासदार जाधव यांनी सांगितले. खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट येऊनसुद्धा विमा कंपनीने अनेक मंडळांमध्ये विमा परतावा नाकारल्यामुळे शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २६ जून) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले अांदाेलन बुधवारी (ता. ४) नवव्या दिवशीही सुरूच होते.

शुक्रवारी (ता. २७) खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन पीक विमा परतावा देण्याची मागणी केली. परंतु त्यावर कोणताही निर्णय न घेतल्यामुळे आंदोलन तीव्र करण्यात आले. बुधवारी (ता. ४) दुपारी एक वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय, त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या दालनात दोन तास शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. यात खासदार संजय जाधव, माजी कृषी राज्यमंत्री तथा काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, भाकपचे राजन क्षीरसागर, माकपचे विलास बाबर, श्रीनिवास जोगदंड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, शेतकरी संघटनेचे माऊली कदम व शेतकरी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT