'युरियावरील लिकिंग रोखा'
'युरियावरील लिकिंग रोखा' 
मुख्य बातम्या

'युरियावरील लिकिंग रोखा'

टीम अॅग्रोवन

अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम जोमात असतानाच जिल्ह्यात अनेक भागांत युरिया खतावर लिकिंग सुरू आहे. परिणामी,  शेतकऱ्यांना अव्वाच्यासव्वा भावाने युरियाची खरेदी करावी लागत आहे. युरियाचा पुरवठाही कमी असल्याने शेतकऱ्यांची वणवण होत आहे. युरियावरील लिकिंग रोखण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार साहेबराव पाटील व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे केली आहे.  माजी आमदार साहेबराव पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की गेल्या पंधरा दिवसांपासून युरियाचा पुरवठा कंपनीकडून अत्यंत कमी होत आहे. ऐन रब्बी हंगामात शेतकरी युरिया खतासाठी वणवण फिरत आहेत. विक्रेते युरियावर इतर विद्राव्य, सूक्ष्मअन्नद्रव्ये खते देतात. फक्त युरिया देत नाहीत. विक्रेते फक्त युरिया देण्यास नकार देत आहेत. रब्बी हंगामात मका, ज्वारी, बाजरी, कांदा आदी पिकांसाठी युरियाची गरज, मागणी अधिक आहे. परिणामी, युरिया अवाच्यासव्वा भावात शेतकरी वर्गाला घ्यावा लागत असून, उत्पादन खर्च वाढत आहे. कुठलीही कारवाई कृषी विभागाने कुठेही केलेली नाही.जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा कृषी अधीक्षक व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडेही तक्रार दिली आहे. लिकिंग रोखण्यासाठी संबंधित खत विक्रेते, वितरकांची चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT