महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री जाहीर
महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री जाहीर 
मुख्य बातम्या

महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री जाहीर

टीम ॲग्रोवन

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री जाहीर झाले असून दिग्गज मंत्र्यांकडे त्यांच्याच जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे, बाकीच्या मंत्र्यांना मात्र अन्य जिल्ह्यांचे पालकमंत्री करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले असतानाच त्यांच्याकडे अतिशय महत्त्वाचे असलेल्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे, तर वळसे पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे छगन भुजबळ नाशिक, धनंजय मुंडे बीड तर जयंत पाटील यांना सांगलीची जबाबदारी दिली आहे.

काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांना त्यांचा नांदेड, नितीन राऊत नागपूर, के.सी पाडवी नंदुरबार, अमित देशमुख लातूर, यशोमती ठाकूर अमरावती असे त्यांचेच जिल्हे दिले आहेत. शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यासह गडचिरोलीची जाबाबदारी दिली आहे. आदित्य ठाकरे मुंबई उपनगरचे पालकमंत्री असतील. सुभाष देसाई औरंगाबाद,  अनिल परब रत्नागिरी, दादा भुसे पालघर, गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असतील.

ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाकडे जिल्ह्याची जबाबदारी महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे जिल्ह्यात जास्त आमदार त्या पक्षाकडे तेथील जबाबदारी दिली आहे, यानुसार कोल्हापूर बाळासाहेब थोरात, अहमदनगर हसन मुश्रीफ, नागपूर नितीन राऊत, ठाणे एकनाथ शिंदे, असे अनेक ठिकाणी पालकमंत्री नेमले आहेत.                                                                     पालकमंत्री पुढीलप्रमाणे...

  • १.  पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
  • २. मुंबई शहर - श्री. अस्लम रमजान अली शेख
  • ३. मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे 
  • ४. ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
  • ५. रायगड - श्रीमती आदिती सुनील तटकरे
  • ६. रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
  • ७. सिंधुदुर्ग- श्री. उदय रवींद्र सामंत
  • ८. पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे
  • ९. नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
  • १०. धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार
  • ११. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
  • १२. जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
  • १३. अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
  • १४. सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
  • १५. सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील
  • १६. सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
  • १७. कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
  • १८. औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई
  • १९. जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे
  • २०. परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
  • २१. हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
  • २२. बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
  • २३. नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
  • २४. उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
  • २५. लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख
  • २६. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
  • २७. अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
  • २८. वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
  • २९. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
  • ३०. यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड
  • ३१. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
  • ३२. वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार
  • ३३. भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
  • ३४. गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख
  • ३५. चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
  • ३६. गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

    Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    SCROLL FOR NEXT