राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून 
मुख्य बातम्या

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला १७ जूनपासून प्रारंभ होत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी २०१९-२० या वर्षाचा अंतिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक मंगळवारी (ता. २८) विधान भवनात पार पडली. बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यात आले. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अलीकडेच निधन झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंत डोळस यांना श्रद्धांजली वाहून कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले जाईल. १८ जून रोजी दोन्ही सभागृहांत २०१९-२० या वर्षाचा अंतिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने २७ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंतिम अर्थसंकल्पात लोकानुयायी घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर १९ आणि २० जून रोजी चर्चा केली जाईल. तर २१ आणि २४ जून रोजी अंतिम अर्थसंकल्पावर चर्चा करून तो मंजूर करण्यात येईल. समितीने अधिवेशनाचे २ जुलै २०१९ पर्यंतचे कामकाज निश्चित केले आहे. त्यामुळे अधिवेशन १२ दिवस चालेल असा अंदाज आहे.  कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT