उद्योग सुरू करा; अन्यथा वाहतूक व्यवसाय संपेल : प्रकाश गवळी
उद्योग सुरू करा; अन्यथा वाहतूक व्यवसाय संपेल : प्रकाश गवळी 
मुख्य बातम्या

उद्योग सुरू करा; अन्यथा वाहतूक व्यवसाय संपेल : प्रकाश गवळी

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः सरकारने उद्योग धंदे सुरू करण्याचा निर्णय घेतला नाही, तर माल वाहतूकदारांचा व्यवसाय पूर्णतः संपेल. त्यामुळे गंभीर परिस्थिती नसलेल्या ठिकाणी उद्योगांना परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसचे संचालक प्रकाश गवळी यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या खास मुलाखतीत केली.  गवळी म्हणाले, ‘‘देशात ट्रकची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे. तशीच परिस्थिती बस, रिक्षा, टॅक्‍सी यांची आहे. लॉकडाउनमुळे या व्यवसायातील चालक, मालक व अन्य कामगारांच्या कुटुंबाची कुचंबणा झाली आहे. अत्यावश्‍यक सेवेसाठी सुरू असलेल्यांनाही परतीचे भाडे मिळत नाही. यातील प्रत्येकाने कर्ज काढून वाहने घेतली आहेत. हप्ते भरण्यासाठी मुदत दिली असली, तरी तीन महिन्यानंतर व्याजासह हप्ता भरावाच लागणार आहे. त्यामुळे या व्यवसायात गुंतलेल्या लाखोंच्या मदतीचे धोरण शासनाने घेतले पाहिजे; अन्यथा वाहतूकदार संपतील. त्याचा परिणाम शेवटी पुरवठ्यावर व पर्यायाने शासनावरही होणार आहे.’’  ‘‘सध्या अत्यावश्‍यक सेवेमध्ये फार कमी वाहने सुरू आहेत. त्यामुळे वाहन व्यवसाय पुन्हा सुरू होण्यासाठी उद्योग-धंदे सुरू झाले पाहिजेत. उद्योग धंदे सुरू झाले, तरच वाहन व्यवसाय सुरक्षित राहील. अनेक वाहने राज्यात, परराज्यात ठिकठिकाणी अडकली आहेत. त्यावरील चालक व अन्य कामगारांचे जेवणाचे, अंघोळीचे हाल होत आहेत. त्यामुळे शासनाने रेड झोन वगळता अन्य ठिकाणी वाहतुकीला परवानगी देणे आवश्‍यक आहे. या भूमिकेबरोबर रस्त्यावर येणाऱ्या वाहतूकदारांसाठी लोडिंग व अनलोडिंग पॉइंटवर सर्व वाहन चालकांसाठी खाद्य सुविधा उपलब्ध करून देणे, हॉटेल व ढाबे वाहन चालकांसाठी उघडले जावेत. सर्व ट्रक उत्पादक कंपन्यांनी दुरुस्तीच्या बाबतीत उपस्थित राहण्यासाठी सर्व प्रमुख मार्गांवर त्यांच्या कार्यशाळा उघडाव्यात याबाबत शासनाने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे,’’ असेही गवळी यांनी नमूद केले.  कोरोनाचा प्रसार न होणे ही शासनाबरोबरच सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर वाहन चालक, मालक व याबाबतच्या अन्य यंत्रणाही आपली जबाबदारी योग्य रितीने पाळून कोरोनाचा प्रसार होणार नाही, याबाबत दक्षता घेतील. त्याबाबत संघटनेकडूनही पाठपुरावा केला जाईल; परंतु सर्वांची होणारी उपासमार व संपूर्ण वाहतूक उद्योगासमोर असलेले बंदचे सावट टाळण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही गवळी यांनी केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT