तंबाखूवरील पाने खाणारी लष्करी अळी  (स्पोडोप्टेरा लिट्युरा)
तंबाखूवरील पाने खाणारी लष्करी अळी (स्पोडोप्टेरा लिट्युरा) 
मुख्य बातम्या

द्राक्षावर तंबाखूची पाने खाणारी अळी

टीम अॅग्रोवन

भवानीनगर, जि. पुणे : द्राक्षावर यंदाही तंबाखूवरील पाने खाणारी लष्करी अळी (स्पोडोप्टेरा लिट्युरा) दिसल्याने बागातदार हवालदिल झाले आहेत. तंबाखूची पाने खाणारी स्पोडोप्टेरा लिट्युरा ही अळी असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. बारामती उपविभागात द्राक्षबागांमध्ये आढळलेल्या अळ्यांचे नमुने गोळा करून ते माळेगाव (ता. बारामती) येथील राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासले जाणार असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी  दिली.   अमेरिकन लष्करी अळीने एकंदरीत मका उत्पादकच नव्हे; तर डेअरी, पोल्ट्री उद्योगालाही याची झळ बसू लागल्याने सर्वच हवालदिल झाले आहेत. त्यातच द्राक्षबागांवरही ही अळी दिसून आल्याने या संकटाची व्याप्ती वाढली आहे. द्राक्षबागांवर तंबाखूवरील पाने खाणारी लष्करी अळी दिसल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत; परंतु कृषी विभागाने केलेल्या पाहणीत द्राक्षावरील ही अळी स्पोडोप्टेरा लिट्युरा ही सर्वसाधारण व एरवीही आढळणारी अळी असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. द्राक्ष उत्पादकांनी चिंतित होण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे. "द्राक्ष उत्पादकांनी घाबरून जाऊ नये' संबंधित अळी दिसल्यानंतर सुरवातीपासूनच कृषी विभागही सतर्क असून कृषी विभागाकडून या अळीची पाहणी करण्यात आली आहे. ही अळी लष्करी अळी नसल्याचे दिसत असून दोन दिवसांत त्याची तपासणी होईल. मात्र मका पिकाप्रमाणे द्राक्ष उत्पादकांनी घाबरून जाऊ नये. 

बोरी (ता. इंदापूर) येथील द्राक्षबागेत आढळलेल्या अळ्या या लष्करी अळीप्रमाणेच असून या अळ्या यापूर्वी बागेत कधीही दिसलेल्या नाहीत. - भारत शिंदे, प्रगतशील द्राक्ष उत्पादक, बोरी (ता. इंदापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT