रब्बी हंगामात अकोला जिल्ह्यात होणार महिलांच्या खास शेतीशाळा
रब्बी हंगामात अकोला जिल्ह्यात होणार महिलांच्या खास शेतीशाळा 
मुख्य बातम्या

रब्बी हंगामात अकोला जिल्ह्यात होणार महिलांच्या खास शेतीशाळा

टीम अॅग्रोवन

अकोला  ः यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असून, परतीच्या पावसाने रब्बीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कृषी विभागाने रब्बीसाठी विविध पातळ्यांवर नियोजन केले असून, या मोसमात महिलांच्या खास शेतीशाळासुद्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. पीक प्रात्यक्षिके, शेतीशाळा आणि क्रॉपसॅप योजनेचे निरीक्षण घेण्यासाठी जिल्ह्यातील अकोला व अकोट उपविभागात लक्ष्यांकाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा स्तरावरून भौतिक लक्ष्यांकाप्रमाणे कृषी निविष्ठांचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिला कृषी सहायकांची निवड केलेल्या गावांमध्ये संलग्न शेतीशाळा, प्रात्यक्षिक व क्रॉपसॅप योजनेत लाभार्थी निवड करून हरभरा पिकाची शेतीशाळा घेण्याचे सुचविण्यात आले आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात ३३ महिला शेतीशाळा राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी दिली. या हंगामात जिल्ह्यात हरभरा पिकाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, आत्मा आणि पोकरा प्रकल्पातून ३०३ शेतीशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.  १६ आठवडे  चालणाऱ्या या शेतीशाळा १ नोव्हेंबरपासून सुरू होत असून, १ मार्चपर्यंत चालणार आहेत. अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर या तालुक्यात कार्यरत महिला कृषी सहायकांना ३३ शेतीशाळांची जबाबदारी देण्यात आली आहे. उर्वरित शेतीशाळा कृषी कर्मचारी घेतील.   संपूर्ण हंगामाचा आराखडा तयार पहिल्यांदाच रब्बी हंगामात आयोजित शेतीशाळांसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. कुठल्या तारखेला काय करावे, अहवाल, क्षेत्रीय भेट, पीक कापणी, मळणी अशा विविध विषयांचे सविस्तर नियोजन देण्यात आले आहे. या हंगामात होणारी पेरणी ही बीबीएफच्या साह्याने करण्याचे नियोजन आहे. या हंगामात चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. शेतीशाळांमध्ये होईल तंत्रज्ञान प्रसारित शेतीशाळेत सांघिक खेळ, महिलांचे गट तयार करणे, पीक निरीक्षणे, विश्लेषण, शेतकऱ्यांची निवड, शेळी शाळा संकल्पना, कार्यपद्धती, महत्त्व, तोंडओळख, पिकासाठी जमीन निवड, मातीनमुना, पाणी नमुना, माती व पाणी अहवालानुसार अन्नद्रव्याचे व्यवस्थापन, बीजप्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता तपासणे, बियाणे खरेदीची पावती व पाकीट हंगाम संपेपर्यंत सांभाळणे, बीबीएफचा पेरणीसाठी वापर, खते देताना घ्यावयाची काळजी अशा विविध विषयांवर चर्चा होईल.  महिलांच्या आरोग्याचीही घेणार काळजी महिलांसाठी आयोजित शेतीशाळांमध्ये कृषी तंत्रज्ञान प्रसारासोबतच महिलांच्या सर्वांगीण आरोग्यविषयक बाबींवरही चर्चा होईल. महिलांना भेडसावणारे विविध आजार, त्यावरील उपाययोजना याबाबत प्रत्येक शाळेत गरजेनुसार विविध रोगांचे तज्ज्ञ डॉक्टरही उपस्थित राहतील. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा अधीक्षक मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनात रोटरी, लायन्स क्लब आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या सहकार्याने आरोग्य सुविधा, मार्गदर्शन पुरविण्‍यात येणार आहे. १ नोव्हेंबरपासूनच या शेतीशाळांना सुरुवात होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT