दोन लाख हेक्‍टरवर सोयाबीनचे ‘ग्राम बीजोत्पादन’
दोन लाख हेक्‍टरवर सोयाबीनचे ‘ग्राम बीजोत्पादन’ 
मुख्य बातम्या

दोन लाख हेक्‍टरवर सोयाबीनचे ‘ग्राम बीजोत्पादन’

टीम अॅग्रोवन

नगर  : केंद्र शासनाच्या (एमएमएईटी) व बियाणे, लागवड साहित्य उपअभियान (एसएमएसपी) योजनेतून राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे २ लाख १४ हजार ६६६ हेक्‍टर क्षेत्रावर ग्रामबीजोत्पादन घेतले जाणार आहे. त्यासाठी १ लाख ६१ हजार क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करू देणार आहे. त्यासाठी प्रती लाभार्थी एक एकर क्षेत्राची मर्यादा असेल. तालुका कृषी अधिकारी त्यासाठी परवाना देतील. त्यानतंर शेतकऱ्यांना दुकानातून बियाणे मिळेल. कृषी विभागातर्फे पुढील वर्षी बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी दरवर्षी खरिपात ग्राम बीजोत्पादन घेतले जाते. यंदा केंद्र शासनाच्या कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानअंतर्गत (एमएमएईटी) व बियाणे, लागवड साहित्य उपअभियान (एसएमएसपी) योजनेतून राज्यभरातील २२ जिल्ह्यामध्ये २ लाख १४ हजार ६६६ हेक्‍टर क्षेत्रावर ग्रामबीजोत्पादन करण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक लाभार्थ्यां एक एकर क्षेत्रापर्यंत लाभ घेता येणार आहे. बियाणे बाजारातील विक्रेत्यांकडे उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून परवाना घ्यावा लागणार आहे. प्रत्येक क्विंटलमागे १७०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. ग्रामबीजोत्पादनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पीक फुलोऱ्यात असताना महाबीजतर्फे प्रशिक्षण देण्यात येईल. उत्पादित झालेले बियाणे पुढील वर्षी वापरता येणार आहे. बियाणांची टंचाई होऊ नये म्हणून हा उपक्रम राबवला जातो असे कृषी विभागातून सांगण्यात आले. विदर्भ, खानदेशातील जिल्ह्यांमध्ये हे क्षेत्र अधिक असेल. नगर जिल्ह्यामध्ये सहा हजार सहाशे ६० हेक्‍टरवर ग्रामबीजोत्पादन घेतले जाणार आहे.

जिल्हानिहाय दिले जाणारे बियाणे (क्‍विंटलमध्ये) नशिक ः २७००, धुळे ः ८००, नंदुरबार ः ७००, जळगाव ः १८००, नगर ः ५०००, सोलापूर ः २०००, औरंगाबाद ः १८००, जालना ः ५०००, बीड ः १०,०००, लातूर ः १५०००, परभणी ः ६०००, हिंगोली ः १४००, उस्मानाबाद ः ८०००, नांदेड ः ९०००, बुलढाणा ः ११०००, अकोला ः १७०००, वाशीम ः १७०००, अमरावती ः १८०००, यवतमाळ ः २५०००, वर्धा ः २५००, नागपूर ः ५००, चंद्रपूर ः १२७०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT