cotton
cotton  
मुख्य बातम्या

कापूस, सोयाबीन उत्पादक विमा कंपन्यांकडून वाऱ्यावर 

टीम अॅग्रोवन

गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे १३ कोटी ७१ लाख रुपयांची भरपाई पीकविमा कंपन्यांकडून देण्यात आली. मात्र त्याचवेळी कापूस व सोयाबीन उत्पादकांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्‍त होत आहे.  नक्षलप्रवण आदिवासीबहूल आणि दुर्गम अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात धान लागवड क्षेत्र सर्वाधीक आहे. नजीकच्या काळात नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन, कापूस यासारख्या पिकाकडे देखील वळले आहेत. नैसर्गिक संकटातून सावरता यावे याकरीता शेतकऱ्यांव्दारे या पिकांना विमा संरक्षण दिले जाते. त्यासाठी ठरावीक विमा हप्ताही भरण्यात येतो. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई यातून होईल, अशी अपेक्षा त्यांना असते.  परंतु गेल्या हंगामात या भागातील शेतकऱ्यांना धानाचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली. त्याचवेळी कापूस, सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र भरपाईपासून डावलण्यात आले. गेल्यावर्षी पीकविम्याबाबत जागृती करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. २०१९ मध्ये १ हजार ६२ हेक्‍टर क्षेत्रावरील कापूस पिकाचा विमा काढण्यात आला. सोयाबीनचा १०९ हेक्‍टर तर धान पिकाचा सर्वाधीक २८ हजार ३२४ हेक्‍टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला. विमा हप्ता म्हणून ५ कोटी ५५ लाख रुपयांचा भरणा केला.  गेल्यावर्षी सर्वाधीक पाऊस झाला. खोलगट भागातील जमिनीत तसेच नदी, नाल्यांच्या काठावर असलेल्या जमिनीत पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर विमा कंपन्यांनी ३४ हजार ६४७ शेतकऱ्यांना १३ कोटी ७१ लाख रुपयांचा विमा दावा मंजूर केला आहे.  पीक विमा योजनेची स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये) (भरपाई रुपयात) 

पीक शेतकरी संरक्षित क्षेत्र लाभधारक भरपाई 
कापूस १०३९ १०६२.८५ शून्य शून्य 
धान ३५,११० २८३२४.४७ ३४६४७ १३७१.३ 
सोयाबीन ८८ १०९.१ शून्य शून्य 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT