सोयाबीनच्या दरात ४०० रुपयांनी वाढ
सोयाबीनच्या दरात ४०० रुपयांनी वाढ  
मुख्य बातम्या

जळगावात सोयाबीनच्या दरात ४०० रुपयांनी वाढ

टीम अॅग्रोवन

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मागील पंधरवड्यात सुधारणा झाली आहे. दरात क्विंटलमागे ३५० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यातच दरवाढ झाल्याने लिलावांनाही प्रतिसाद मिळू लागला आहे. ही दरवाढ टिकून राहील, असा अंदाज अडतदारांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात जळगाव बाजार समिती सर्वांत मोठी आहे. परंतु मध्यंतरी सोयाबीन खरेदीसंबंधी प्रतिसाद नव्हता. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन आवक झाल्यानंतर पडून राहत होती. नाईलाजाने हे सोयाबीन अडतदारांकडे ठेवावे लागायचे. त्यात अडतदार चांगले ग्राहक मिळाल्यास त्याची विक्री करून नंतर शेतकऱ्याला रोखीने पैसे देत होते. परंतु मागील पंधरवड्यात दरांमध्ये सुधारणा व्हायला लागली.

सध्या प्रतिदिन ५०० ते ७०० क्विंटल एवढी आवक होत आहे. लिलाव सकाळीच होत असून, दर्जानुसार दर मिळत आहेत. बाजार समितीमध्येच मार्केटिंग फेडरेशनचे शासकीय सोयाबीन व कडधान्य खरेदी केंद्र सुरू असल्याने दर्जेदार मालाची या केंद्रात शेतकरी विक्री करतात. तर या केंद्रात नाकारलेल्या सोयाबीनला बाजार समितीमध्ये किमान २३०० रुपयांपर्यंत दर मिळतो.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला सोयाबीनचे दर १९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. त्यात हळूहळू सुधारणा होऊ लागली. सद्यःस्थितीत किमान दर २२५० ते २३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असल्याची माहिती मिळाली. सोयाबीनची आवक मध्य प्रदेशातूनही होऊ लागली आहे.

थेट व्यापाऱ्यांकडून तेथून सोयाबीन येतो. शहरातील तेल गिरण्यांमध्ये त्याची बाजार समितीमधील मध्यस्थांकडून पाठवणूक केली जाते, अशी माहिती मिळाली. तसेच जिल्ह्यातील जळगाव, यावल, पाचोरा तालुक्‍यांतूनही सोयाबीन येत आहे.

सोयाबीनची आवक अलीकडे थोडी कमी झालेली आहे. त्याच्या दरात या महिन्यात वाढ होऊ लागली आहे. लिलाव प्रक्रियाही सकाळी होत आहे. क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपये दरवाढ झाली आहे. - लक्ष्मण पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT