अकोल्यात सोयाबीन 2600 ते 3100 रुपये
अकोल्यात सोयाबीन 2600 ते 3100 रुपये 
मुख्य बातम्या

अकोल्यात सोयाबीन 2600 ते 3100 रुपये

टीम अॅग्रोवन

अकोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. 9) सोयाबीनची 2845 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला 2600 ते 3100 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

गेले अनेक महिने दर नसल्याने चिंतातूर असलेल्या सोयाबीन उत्पादकांना आता थोडासा दिलासा मिळू लागला आहे. वऱ्हाडातील सर्वच बाजारांमध्ये सोयाबीन दराने तीन हजारांवर उडी घेतली आहे. यावर्षी सोयाबीनचा हंगाम सुरू झाल्यानंतर बाजारातील दर अवघे 1800 पासून सुरू झाले होते. गेले अनेक महिने सोयाबीनचा दर 2200 ते 2600 रुपये प्रति क्विंटल होता. नववर्षाची सुरवात सोयाबीन दरांसाठी पूरक ठरली आहे. सोयाबीनचा दर 3100 पर्यंत पोचला आहे.

वाशीममध्ये दरात सुधारणा येथील बाजार समितीत सोयाबीनची 2500 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यास किमान 2700 व कमाल 3200 रुपये प्रतिक्विंटल दर होता. या बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

अकोला "कृउबा"तील दर (रुपये प्रतिक्विंटल)

शेतीमाल आवक दर
तूर 1100 3625 ते 4475
हरभरा 447 3100 ते 4265
मूग ... 4300 ते 5100
उडीद ... 3400ते 4100

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT