नेर, जि. यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अमरावती-यवतमाळ मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती.
नेर, जि. यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अमरावती-यवतमाळ मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती.  
मुख्य बातम्या

सोयाबीनला अवघा १८२५ रुपयांचा भाव

सकाळ वृत्तसेवा

नेर, यवतमाळ ः व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची अवघ्या १८२५ रुपये प्रतिक्‍विंटलने खरेदी केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नेर बाजार समितीसमोर तीव्र आंदोलन केले. सोमवारी (ता. २३) अमरावती- यवतमाळ मार्गावर झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी टायर जाळल्याने वाहतूक बराचवेळ प्रभावित झाली होती.  सोयाबीनला उठाव नसल्याचे कारण सांगत व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदीचा सपाटा लावला आहे. सद्यःस्थितीत २३०० ते २७०० रुपये प्रतिक्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. नेर बाजार समितीत सोमवारी भटकर व ठाकरे या शेतकऱ्यांनी सात क्‍विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. बाजार समितीमधील अडत्याकडे टाकल्यानंतर या मालाची खरेदी अवघ्या १८२५ रुपयांनी झाली. तशी सौदापट्टी देखील करण्यात आली.

बाजार समितीत अशाप्रकारे मातीमोल भावाने सोयाबीन विकले जात असल्याचे पाहून संयमाचा पारा सुटलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक होत अमरावती- यवतमाळ मार्गावर रास्ता रोको केले. युवा शेतकरी संघटनेचे गोपाल चव्हाण हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले. रस्त्याने जात असलेल्या देवानंद पवार व माजी आमदार विजयाताई धोटे यांनीदेखील या आंदोलनात सहभाग घेतला. 

तहसीलदारांनी केली मध्यस्थी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार अमोल पोवार घटनास्थळी पोचले. शासकीय खरेदी केंद्र मंगळवारी (ता. २४) सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना या वेळी दिली. त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष कमी झाल्याने तब्बल तासभरानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT