Sowing of summer soybean on 2000 hectares in Pune division 
मुख्य बातम्या

पुणे विभागात उन्हाळी सोयाबीनची २ हजार हेक्टरवर पेरणी

पुणे : कृषी विभागाकडून सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यानुसार पुणे विभागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : कृषी विभागाकडून सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यानुसार पुणे विभागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. आतापर्यंत दोन हजार २२२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून पुणे विभागात उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली जात नव्हती. मात्र, चालू वर्षी पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे येत्या खरिपासाठी सोयाबीन बियाण्यांचा मोठा प्रश्न उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने उन्हाळ्यात सोयाबीन बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी फेब्रुवारीपासून तयारी सुरू करत उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. 

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. तब्बल एक हजार १८९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात ८५६ हेक्टरवर, तर नगर जिल्ह्यात १७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

नगर जिल्ह्यात नगरमध्ये १२६ हेक्टरवर पेरणी झाली.श्रीगोंदा, संगमनेर या तालुक्यात त्यास अल्प प्रतिसाद दिला. पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला. तालुक्यात तब्बल ५५६ हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली. याशिवाय जुन्नरमध्येही २४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर खेड, हवेली, मुळशी, भोर, मावळ, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, दौंड या तालुक्यातही बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. 

 सोलापुरात बार्शी, उत्तर  पेरणी

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत ३४७ हेक्टर, उत्तर सोलापूरमध्ये २५० हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली आहे. तर दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यातही अल्प प्रमाणात पेरणी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT