हरभरा वाण
हरभरा वाण  
मुख्य बातम्या

हरभऱ्याचा ‘फुले विक्रम’ वाणाला तीन राज्यांत लागवडीस मान्यता

टीम अॅग्रोवन

नगर  ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाने संशोधित केलेल्या ‘फुले विक्रम’ या वाणाच्या लागवडीला महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांत (देशातील मध्य विभागात)ही मान्यता देण्यात आली आहे. बिरसा कृषी विद्यापीठ, रांची (झारखंड) येथे झालेल्या हरभरा संशोधन आढावा बैठकीत ही मान्यता मिळाली आहे. बिरसा कृषी विद्यापीठ, रांची (झारखंड) येथे २७ ते २९ ऑगस्ट अशी तीन दिवस या कालावधीत राष्ट्रीय पातळीवरील वार्षिक हरभरा संशोधन आढावा बैठक झाली. या बैठकीसाठी देशातील विविध राज्यांतून हरभरा संशोधक उपस्थित होते. या बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसित केलेल्या देशी हरभऱ्याच्या ‘फुले विक्रम’ या वाणावर चर्चा झाली. कंबाइन हार्वेस्टरने काढणी करता येणारा वाण असल्याने शेतकऱ्यांसाठी फायद्याचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर देशाच्या मध्य विभागासाठी (महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात) ‘फुले विक्रम’ हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. हा वाण विकसित करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा तसेच संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन सुरू होते. दहा वर्षांच्या संशोधनानंतर संशोधित केलेला हा देशातील तिसरा व राज्यातील पहिलाच वाण आहे, असे कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख डॉ. नंदकुमार कुटे यांनी सांगितले.  ‘फुले विक्रम’ वाणाची वैशिष्ट्ये

  • जमिनीपासून दोन फूट उंच वाढणारा, एक फुटावर घाटे लागतात. 
  • उंच असल्याने कंबाइन हार्वेस्टरने पिकाचे कुठलेही नुकसान न होता व्यवस्थित काढणी करता येते. 
  • मररोगाला प्रतिकार करणारा. पिवळसर मध्यम आकाराचे दाणे लागतात. 
  • उत्पादन क्षमता ४०-४२ क्विंटल प्रतिहेक्‍टर व सरासरी उत्पादन २२ क्विंटल प्रतिहेक्‍टर मिळते. 
  • बागायतीसह जिरायती भागालाही फायद्याचा वाण आहे. 
  • उशिराने लागवड केली, तरीही उत्पादनात फरक पडत नाही. 
  • यांत्रिक पद्धतीने काढता येत असल्याने पीक काढणीवरील खर्चात बचत होते 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

    Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

    Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

    Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    SCROLL FOR NEXT