अवघ्या अडीच हजार हेक्टरवर चारा पेरणी
अवघ्या अडीच हजार हेक्टरवर चारा पेरणी 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात अवघ्या अडीच हजार हेक्टरवर चारा पेरणी

टीम अॅग्रोवन

नगर ः जिल्ह्यातील २८ लाख लहान-मोठ्या जनावरांसाठी सध्या शासकीय आकडेवारीनुसार चारा शिल्लक नाही. तेरा तालुक्‍यांतील चारा मार्चमध्ये संपला असून, एकमेव राहुरी तालुक्‍यातील चाराही या महिन्यात संपेल. या उलट जिल्ह्यात फक्त अडीच हजार हेक्‍टरवर उन्हाळी चारा पिकांच्या पेरण्या झाल्या. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत जनावरांना चारा कोठून उपलब्ध करायचा, हा प्रश्‍न शेतकऱ्यांसह छावणी चालकांना पडत आहे. 

जिल्ह्यात १६ लाख ४१ हजार मोठी व ११ लाख ५० हजार लहान जनावरे आहेत. त्यांना दरमहा दोन लाख ३५ हजार टन चारा लागतो. दुष्काळात पशुधन वाचविण्यासाठी सरकारने चारा छावण्या सुरू केल्या. जिल्ह्यात सुरू असलेल्या ३४३ छावण्यांमध्ये लहान-मोठी दोन लाख नऊ हजार जनावरे आहेत. जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या पशुधनाचा विचार केला, तर पुढील तीन महिन्यांत त्यांच्यासाठी चारा कोठून आणायचा हा प्रश्‍न आहे. 

शासकीय आकडेवारीनुसार नगर, पारनेर, कर्जत, जामखेड आणि पाथर्डी या तालुक्‍यांतील उपलब्ध चारा डिसेंबरअखेर संपला. श्रीरामपूर, श्रीगोंदे आणि संगमनेर तालुक्‍यांतील चारा जानेवारीत संपला. राहाता तालुक्‍यातील चारा फेब्रुवारीपर्यंत पुरला. शेवगाव आणि नेवासे तालुक्‍यांतील चारा गेल्या महिन्यापर्यंत व एकमेव राहुरी तालुक्‍यातील चारा या महिन्यापर्यंत पुरणार आहे. श्रीगोंदे, पाथर्डी, संगमनेर या तीनच तालुक्‍यांमध्ये चारा पिकांची पेरणी झाली आहे. उर्वरित तालुक्‍यांमध्ये मात्र दुष्काळामुळे चारा पिकांची पेरणी झाली नाही. उन्हाळी हंगामात जिल्ह्यात फक्त दोन हजार ५१८ हेक्‍टरवर चारा पिकांची पेरणी करण्यात आली आहे. उन्हाळी हंगामात चारापिके घेतली असती, तर छावण्यांवरील ताण कमी झाला असता. मात्र, चारा पिकांची मार्चअखेरची पेरणी पाहता आगामी काळात जिल्ह्याबाहेरून चारा आणावा लागण्याची शक्‍यता आहे. 

या आहेत उपाययोजना...  चारा पिकांसाठी जिल्हा परिषदेकडे ६५.१६ लाखांची तरतूद आहे. त्यातून बियाणे किंवा गवताची ठोंबे खरेदी करून ते शेतकऱ्यांना वाटून अंदाजे १ लाख ३५ हजार टन चारा उपलब्ध करता येऊ शकतो. जिल्ह्यात अंदाजे ३३ हजार हेक्‍टरवर उसाचे पीक आहे. गरज भासल्यास त्याचा चारा म्हणून वापर करता येईल. राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत २ हजार ६८२ हेक्‍टरवर मका व ज्वारीची पेरणी करून त्यातून एक लाख ३५ हजार टन चारा पिकवता येईल. साखर कारखान्यांत उत्पादित झालेल्या बगॅसवर प्रक्रिया करून त्याचाही चारा म्हणून वापर करता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT