Sowing at 48 percent in Nashik district 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात पेरणी ४८ टक्क्यांवर

नाशिक : चालू वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात पेरण्या रखडल्याचे चित्र होते. मात्र जुलै महिन्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे.

टीम अॅग्रोवन

नाशिक : चालू वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात पेरण्या रखडल्याचे चित्र होते. मात्र जुलै महिन्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. प्रतिकूल परिस्थितीत पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे जिल्ह्याच्या एकूण ६ लाख ६५ हजार ५८२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ३ लाख २१ हजार ५०८ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्याची टक्केवारी ४८.३० टक्के  आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्याच्या पूर्व भागात जूननंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे हाती घेतली. त्यामुळे येवला, नांदगाव, मालेगाव, निफाड, चांदवड या भागात पेरण्या सर्वाधिक झाल्याची स्थिती आहे. मात्र पावसाने जूनच्या मध्यात खंड दिला. त्यानंतर पेरण्या खोळंबल्या होत्या. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक भागात पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा पेरण्यांनी गती घेतल्याने पेरणी क्षेत्रात वाढ झाली.

जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर मक्याच्या लागवडी करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये येवला, नांदगाव, मालेगाव, सटाणा तालुक्यात हे क्षेत्र सर्वाधिक आहे. तर बाजरीचा पेरा मालेगाव, सटाणा व नांदगाव तालुक्यात अधिक आहे. सोयाबीन पिकांकडे देखील शेतकऱ्यांचा कल आहे. बियाणे उपलब्धता, दरवाढ व पाऊस या अडचणी असताना पेरण्या शेतकऱ्यांनी सुरू ठेवल्या. कळवण, निफाड, सिन्नर, येवला व चांदवड तालुक्यात पेरण्या अधिक आहेत. तर मालेगाव, नांदगाव व येवला तालुक्यात कापूस लागवडी सर्वाधिक असल्याचे पेरणी अहवालातून समोर आले आहे. 

भात पट्टा पावसाच्या प्रतीक्षेत 

जिल्ह्याच्या पश्चिम भागात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा तालुक्यात भात लागवडी सर्वाधिक असतात. मात्र चालू वर्षी पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावलेली नाही. त्यामुळे येथील क्षेत्रावर भात लागवड होऊ शकलेल्या नाहीत. किरकोळ लागवडी या संरक्षित पाण्यावर झाल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी लागवडीसाठी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. पाऊस नसल्याने तयार लागवडीयोग्य रोपे पिवळी पडून जात आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Scheme: बांबू योजनेसाठी १५३४ कोटी

Onion Farmer Support: कांद्याच्या भविष्यासाठी प्रोत्साहन द्या, बियाणे निर्यातीवर बंदी घाला

Maharashtra Weather Update: राज्यात विजांसह पावसाचा अंदाज कायम

PDCC Bank: अतिवृष्टीग्रस्तांसाठी पीडीसीसी बँकेची १ कोटी २६ लाखांची मदत

Sugarcane Cultivation : नांदेड विभागात एक लाख ८१ हजार हेक्टरवर उसाची लागवड

SCROLL FOR NEXT