Sorghum prices in Khandesh fixed at Rs 2000
Sorghum prices in Khandesh fixed at Rs 2000 
मुख्य बातम्या

खानदेशात ज्वारीचे दर २००० रुपयांवर स्थिर

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात दादर ज्वारीचे दर १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलरवर स्थिर आहेत. मध्यंतरी आवक वाढताच दादर ज्वारीचे दर व्यापारी, अडतदारांनी पाडले होते.  लॉकडाऊन शिथिल होताच गेले दोन दिवस व्यवहारदेखील गतीने होत आहेत. पण ज्वारीला अद्याप उठाव कमी आहे, असा मुद्दा खरेदीदार उपस्थित करीत आहेत. 

दादर ज्वारीचे दर एप्रिल महिन्याच्या सुरवातीला २४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल होते. सुरवातीला जळगाव बाजार समितीत प्रतिदिन ५०० ते ६०० क्विंटल आवक सुरू होती. परंतु एप्रिलच्या मध्यात जशी कोविडची समस्या वाढली, तसे दरही कमी झाले. एप्रिलमध्ये आवक प्रतिदिन १४०० क्विंटलवर पोचली. आवक वाढताच किमान दर १८०० व कमाल दर २५०० एवढा झाला. फक्त मार्चमध्ये काही शेतकऱ्यांच्या दादर ज्वारीला ३१०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

एप्रिलमध्ये सरासरी दर २००० रुपये प्रतिक्विंटल होता. याबाबत शेतकऱ्यांनी जळगाव, अमळनेर व चोपडा बाजार समितीत नाराजी व्यक्त करून दर पाडल्याचा आरोप अडतदारांवर केला. यानंतर अडतदारांनी आम्ही लिलावात सहभागी होणार नाही, असा पवित्रा घेतला. आता लॉकडाऊन दूर झाल्याने व्यवहार सुरू झाले आहेत. 

आवक टिकून  

मध्यंतरी लिलाव प्रकियाच बंद होती. ही प्रकिया अमळनेर, चोपडा येथे कमी कालावधीसाठी सुरू आहे. सध्या दरांबाबतचा तिढा सुटला नसला तरी दर स्थिरावले आहेत. उठाव वाढल्यास दरवाढ होऊ शकते. पण तूर्त दर वाढणार नाहीत. कारण आवक टिकून आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Government Contractor Movement : सर्व विभागांतील कंत्राटदारांचे ७ मेपासून काम बंद आंदोलन

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT