ज्वारीचा पीकविमा, दुष्काळी अनुदान मिळेना
ज्वारीचा पीकविमा, दुष्काळी अनुदान मिळेना 
मुख्य बातम्या

ज्वारीचा पीकविमा, दुष्काळी अनुदान मिळेना

टीम अॅग्रोवन

पैठण जि. औरंगाबाद :  मंजूर असलेला रब्बी ज्वारीचा पीकविमा व दुष्काळी अनुदान अजूनही आडूळ व परिसरातील काही शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची स्थिती आहे. दुष्काळी अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या तहसीलवर चकरा सुरू आहेत. अनुदान मिळणार केव्हा, हा प्रश्‍न त्यांना पडला आहे. दुसरीकडे पावसाअभावी बाजरी पीक सुकून जात आहे. याबरोबरच कोरडवाहू कपाशीच्या पिकावरही संकटाचे सावट आहे.  

गेल्या खरीप व रब्बी हंगामात संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट होते. अजूनही त्या संकटाची तिव्रता कमी झालेली नाही. आडूळ मंडळात अपेक्षित पऊस नाही. पिके सुकून चालली आहेत. आठवडाभरात या ठिकाणी केवळ ४५ मिलिमीटर पाऊस पडला. आजपर्यंत या मंडळात २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पुन्हा एकदा पिकांवरील संकट गडद झाले आहे. अशातच शासनाकडून दिला जाणारा रब्बी ज्वारीचा पीकविमा अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

दुष्काळी अनुदानासाठी आंतरवली खांडी येथील शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयावर वाऱ्या सुरू आहेत. ‘येईल पुढच्या आठवड्यात, बजेट नाही’, अशी उत्तरे तिथे शेतकऱ्यांना मिळत आहेत. येथील सुभाष डिघुळे, धर्मराज डिघुळे, कृष्णा डिघुळे, सखुबाई डिघुळे, रामेश्‍वर डिघुळे, रामेश्‍वर ढाकणे, रेखा ढाकणे, ज्ञानेश्‍वर डिघुळे, रामभाऊ डिघुळे, तर देवगाव येथील विक्रम कोठूळे व आडूळ येथील किरण वाघ आदी शेतकरी रब्बी ज्वारीच्या पीकविम्यापासून वंचित आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाची प्रतीक्षा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT