A soothing law for farmers: Chandrakant Patil
A soothing law for farmers: Chandrakant Patil 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः चंद्रकांत पाटील

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य विधेयक हे शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या तोडणारे आहे. या विधेयकातील तरतुदींच्या अंमलबजावणीनंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट होणार आहे, मात्र, शेतकऱ्यांविषयी खोटा कळवळा असणारे विरोधक या विधेयकाबद्दल गैरसमज पसरवत आहेत. परंतु शेतकऱ्याला हे विधेयक सुखावणारे आहे. त्यामुळेच गावागावात शेतकऱ्यांनी गुढ्या उभ्या केल्या आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

कृषी विधेयकासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. श्री पाटील म्हणाले की, नव्या कृषी विधेयकाच्या मंजुरीने यापुढे शेतकरी आपला शेतीमाल कोठेही विकू शकतो. त्याला बाजार समितीचे बंधन असणार नाही. त्याची इच्छा असेल तर तो आपले शेत एखाद्या कंपनीला करार शेतीसाठी देऊ शकतो. हे सर्व शेतकऱ्यांच्या संमतीनेच होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या तुटल्या आहेत. विधेयकामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होणार आहे. २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणे हा यामागचा उद्देश आहे. विरोधकांना मात्र, शेतकऱ्यांचे हित बघवत नाही त्यामुळे त्यांनी याला विरोध केला आहे.

शेतकऱ्यांचे हित जपणारे अशी शरद पवार यांची ओळख आहे. मात्र, शेतकरी हिताच्या इतक्‍या महत्त्वाच्या विधेयकावेळी ते सभागृहात उपस्थित का नव्हते? असा प्रश्‍न आहे. यावरून त्यांचे शेतकरी प्रेम किती आहे, हे दिसते. त्यांच्या पक्षाचे खासदारही राज्यसभेतून निघून गेले. या कृषी विधेयकातील बहुतांशी तरतुदी या एकेकाळी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात होत्या. आता ते यालाच विरोध करत आहेत. - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्य क्ष, भाजप

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT