सोनापूर (देशपांडे), जि. चंद्रपूर ः गामस्थांना गृहकराची पावती देताना ग्रामसेवक आशिष आकनूरवार आणि संगणक चालक सिचन पाल.
सोनापूर (देशपांडे), जि. चंद्रपूर ः गामस्थांना गृहकराची पावती देताना ग्रामसेवक आशिष आकनूरवार आणि संगणक चालक सिचन पाल. 
मुख्य बातम्या

सोनापूर ग्रामपंचायत झाली पेपरलेस

संदीप रायपुरे

गोंडपिपरी : डिजिटल तंत्रज्ञानामुळे आता प्रशासकीय कारभार पेपरलेस करण्यावर शासनाचा भर आहे. परंतु अद्ययावत सुविधा देऊनही याचा उपयोग फार कमी ग्रामपंचायतीमध्ये होताना दिसतो. मात्र, राज्याच्या सीमेवर असलेल्या सोनापूर (देशपांडे) ग्रामपंचायतीने दैनंदिन कामकाजामध्ये  ‘ई-ग्रामसॉफ्ट` प्रणालीचा प्रभावीपणे वापर करीत जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान पटकविला.     महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर (देशपांडे) ही ग्रामपंचायत  गावाच्या विकासासाठी नेहमी प्रयोगशील उपक्रम राबविते.  ग्रामपंचायतीने आपले सरकार योजनेतील ‘ई-ग्रामसॉफ्ट`  संगणक प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्यास सुरवात केली आहे. या माध्यमातून गावकऱ्यांना ३३ प्रकारचे विविध दाखले ग्रामपंचायतीमधून अॉनलाइन मिळतात. आर्थिक व्यवहार, तसेच विविध प्रकारच्या नोंदी संगणकावर  करण्यास सुरवात झाली आहे.   ‘ई-ग्रामसॉफ्ट` प्रणालीतून ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेस करण्याची संकल्पना ग्रामविकास विभागाने मांडली. या माध्यमातून ग्रामपंचायतीतर्फे देण्यात येणाऱ्या सर्व माहितीचे संकलन या प्रणालीत होते. यानंतर  प्रणालीच्या माध्यमातून ग्रामस्थांना विविध दाखले मिळण्याची सुविधा आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना ‘ई-ग्रामसॉफ्ट` प्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे.   सोनापूर (देशपांडे) गावच्या सरपंच जया सातपुते, ग्रामसेवक आशिष आकनूरवार यांनी  या प्रणालीच्या वापरासाठी पुढाकार घेत प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात केली.  या प्रणालीमुळे ग्रामपंचायतीतून नागरिकांना विविध प्रकारचे १ ते ३३ दाखले अॉनलाइन मिळू लागले आहेत.  ई-ग्रामसाॅफ्ट प्रणालीचा प्रभावीपणे वापर करून सोनापूर (देशपांडे) या ग्रामपंचायतीने जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान पटकविला. आता सोनापूर (देशपांडे) ग्रामपंचायतीत आता हस्तलि.िखत नोंदी बंद झाल्या असून, संपूर्ण कारभार आॅनलाइन झाला आहे. पंचायत समितीचे सभापती दीपक सातपुते, संवर्ग विकास अधिकारी शेषराव बुलकुंडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, विस्तार अधिकारी श्री. देवतळे, श्री. सावसागळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक चालक सचिन पाल, तालुका समन्वयक अमोल वानखेडे यांच्या मदतीने सरपंच जया सातपुते, ग्रामसेवक आशिष आकनुरवार यांनी सोनापूर (देशपांडे) ग्रामपंचायतीला हा मान मिळवून दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT