sonali variety
sonali variety  
मुख्य बातम्या

पंढरपूरच्या कडधान्य केंद्राकडून चवळीचे ‘सोनाली’ वाण विकसित

टीम अॅग्रोवन

सोलापूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पंढरपुरात कार्यरत असलेल्या कडधान्य आणि तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या चवळीच्या ‘फुले सोनाली’ या पांढऱ्या वाणास अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ४८व्या संयुक्त कृषी आढावा बैठकीत मान्यता मिळाली आहे.  संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सच्चिदानंद तांबे यांच्या नेतृत्वाखालील या केंद्राने हे वाण विकसित केले आहे. या कामात आर. एस. चव्हाण, आर. एम. बनसोडे, पी. टी. कुसळकर, जी.डी. वागज आणि एस. एस. देशमुख यांनी मदत केली. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रासाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॅा. शरद गडाख, सोलापुरातील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॅा. विजय अमृतसागर, वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. ए.एस. जाधव यांनी यासाठी मार्गदर्शन केले. 

‘सोनाली’ वाणाची वैशिष्ट्ये

  • प्रति हेक्टरी सरासरी उत्पन्न १० ते १३ क्विंटल
  • बियाण्याचा रंग पांढरा
  • कालावधी ७१ ते ७५ दिवस, एकाचवेळी पक्वता
  • बुटकी व उभट वाढ
  • आंतरपीक म्हणून घेण्यास उपयुक्त
  • शंभर दाण्याचे वजन १० ते १३ ग्रॅम
  • रोग व किडीस प्रतिकारक्षम
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

    Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

    SCROLL FOR NEXT