वाशीम जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणार : मुख्यमंत्री ठाकरे
वाशीम जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणार : मुख्यमंत्री ठाकरे 
मुख्य बातम्या

वाशीम जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणार : मुख्यमंत्री ठाकरे

टीम अॅग्रोवन

वाशीम : ‘‘राज्यातील आकांक्षित जिल्ह्यांपैकी एक वाशीमला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांखाली निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर भौगोलिक रचनेमुळे जिल्ह्यात सिंचनासाठी मोठे प्रकल्प उभारणे शक्य नसले, तरी लघुसिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील’’, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

विधानभवन येथील मंत्री परिषद सभागृहात झालेल्या वाशीम जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, लखन मलिक, अमित झनक, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात सिंचनासाठी मोठे प्रकल्प नाहीत. त्यामुळे सिंचनाचा भार हा लघु प्रकल्पांवर आहे. अडाण नदीवर ३ बॅरेजस उभारण्याचा प्रस्ताव आहे. यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत कार्यवाही करावी, तसेच जिल्ह्यातील लघु प्रकल्पांची कालवे दुरुस्ती झाल्यास पूर्ण क्षमतेने सिंचन होऊन सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होईल. जानोरी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.’’

‘‘दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी, जिल्ह्यातील दूध संघ कार्यान्वित होण्यासाठी पावले उचलण्यात येतील. देशी गायींचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न होतील. जिल्हा महिला रुग्णालय व कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उर्वरित कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी उपाययोजना आणि नावीन्यपूर्ण योजना आखाव्या. प्रशासनाने जिल्ह्याला विकासाच्या मार्गाने न्यावे’’, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

कृषिपंपांना मार्च अखेरपर्यंत वीजपुरवठा

जिल्ह्यात नोव्हेंबर २०१९ अखेरपर्यंत प्रलंबित वीज जोडण्यांपैकी आत्तापर्यंत सुमारे २५०० कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित सुमारे ४५०० कृषिपंपांना मार्च अखेरपर्यंत वीजपुरवठा करण्यात येईल. वीजपुरवठा करताना ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास या ठिकाणी जास्त खर्च येत आहे. त्यामुळे या ठिकाणी सौर कृषीपंप देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळणे शक्य होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT