Like soldiers, the safety of doctors is important: Chhagan Bhujbal
Like soldiers, the safety of doctors is important: Chhagan Bhujbal 
मुख्य बातम्या

सैनिकांप्रमाणे डाॅक्टरांचीही सुरक्षितता महत्त्वाची ः छगन भुजबळ

टीम अॅग्रोवन

नाशिक : देशभरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असून सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रमाणे रुग्णांच्या जीवासाठी ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या डॉक्टरांची सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने देणगी नव्हे तर डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फेस शिल्ड मास्कचे वितरण करण्यात येत आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेत खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने कृतज्ञता म्हणून रविवारी (ता. १९) फेस शिल्ड मास्कचे वितरण श्री. भुजबळ यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हेमंत टकले, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉ. अमोल वाजे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे, सचिव डॉ. सुदर्शन आहिरे, उपाध्यक्ष डॉ. प्राजक्ता लेले, खजिनदार डॉ. प्रशांत सोनावणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

‘कोरोना’च्या बचावासाठी खासगी रुग्णालये सुरू ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. संपूर्ण जग ‘कोरोना’शी लढत असताना डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने फेस शिल्ड मास्क तयार करण्यात आले आहे.  खासगी डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफला राष्ट्रवादी डॉक्टर सेल व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या समन्वयातून साहित्य वाटप करण्यात येत आहे. राज्यभरातील दीड लाख डॉक्टरांना फेस शिल्ड मास्कचे वाटप करण्यात येत असून याची सुरवात नाशिक येथून करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT