Solar agricultural pumps to over five thousand farmers in Nanded, Parbhani, Hingoli
Solar agricultural pumps to over five thousand farmers in Nanded, Parbhani, Hingoli 
मुख्य बातम्या

नांदेड, परभणी, हिंगोलीत पाच हजारावर शेतकऱ्यांना सौर कृषी पंप

टीम अॅग्रोवन

नांदेड : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सौर कृषिपंप वीज जोडणीचे काम प्रगतीपथावर आहे. नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ५ हजार २७२ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाव्दारे प्रत्यक्ष वीज जोडणी देण्यात आली आहे.  

शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहेत. यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही, अनामत रक्कम भरूनही त्यांची  वीजजोडणी  प्रलंबित  आहे,  अशा  शेतकऱ्यांना  या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे. नांदेड परिमंडळासाठी ९ हजार १०५ शेतकऱ्यांना सौरकृषीपंपाव्दारे वीज जोडणी देण्याचे निर्धारित आहे. त्यानुसार वाटचाल सुरू असून ९ हजार ३७७ शेतकऱ्यांनी कोटेशन भरले आहे. आपल्या हिस्स्याची रक्कम भरलेल्या ९ हजार ६७ शेतकऱ्यांनी एजन्सीची निवड केलेली आहे. आजपर्यंत ५ हजार २७२ शेतकऱ्यांना सौरकृषीपंपा व्दारे वीज जोडणी दिली आहे.

नांदेड जिल्ह्यासाठी २ हजार ७८६ सौरकृषीपंप स्थापित करण्याचे लक्ष आहे. मंजूर अर्जापैकी ३४३२ शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले आहेत. यापैकी १९२४ शेतकऱ्यांनी आपल्या हिश्याची रक्कम भरलेली आहे. यातील कोटेशन भरलेल्या १७९१ शेतकऱ्यांनी एजन्सीची निवड केली आहे. ११३१ शेतकऱ्यांना सौर कृषीपंपा व्दारे वीज जोडणी दिली आहे.

परभणी जिल्हयासाठी ४ हजार ४२८ सौर कृषीपंप स्थापित करण्याचे निर्धारित आहे. मंजूर अर्जापैकी ५३७६ शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले आहेत. यापैकी ३९०७ शेतकऱ्यांनी आपल्या हिश्याची रक्कम भरले. १९२५ शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली आहे.

हिंगोली जिल्ह्यासाठी १ हजार ८९१ पंप आहेत. मंजूर अर्जापैकी ५०५२ शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले. यापैकी ३५४६ शेतकऱ्यांनी रक्कम भरली. यातील ३४३३ शेतकऱ्यांनी एजन्सीची निवड केली. २२१६ शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली आहे.

नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे, परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे, हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी आढावा घेतला. लवकर उर्वरित शेतकऱ्यांना सौरकृषी पंपाव्दारे वीज जोडणी देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सर्व एजन्सी कामाला लागल्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे शाश्‍वत सिंचनाचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे.

नांदेड परिमंडळातील कृषी वापरासाठी पारेषणविरहीत ९ हजार १०५ सौर कृषिपंप स्थापित करण्याचे निर्धारीत लक्ष आहे. त्यानुसार सौरपंप उभारण्याचे काम ही प्रगतीपथावर आहे. या योजनेमुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्यास मदत होईल.  - दत्तात्रय पडळकर,  मुख्य अभियंता, नांदेड परिमंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT