मुख्य बातम्या

सोलापुरात नव्या १११ तलाठी सजा; १९ मंडलांस मंजुरी

टीम अॅग्रोवन

सोलापूर : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात १११ तलाठी सजा आणि १९ नव्या मंडलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता नव्याने या १११ तलाठी सजा आणि १९ मंडलांची भर पडणार आहे. याबरोबरच प्रशासनाचे कामही आणखी सुलभ होण्यास मदत होणार आहे. सुमारे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय शासनाने जाहीर केला आहे.

दरम्यान, शासनाने यासंबंधी प्रातांधिकाऱ्यांची सोमवारी (ता.३१) बैठक बोलावण्यात आली आहे. त्याशिवाय १५ ऑगस्टपर्यंत पदमान्यतेसाठी पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. सोलापूर शहरात सर्वाधिक १० तलाठी सजा तर ४ मंडल निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या शहरात एक मंडल व तीन तलाठी सजा आहेत. मंजुरी मिळालेल्या १११ तलाठी सजामध्ये महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील ४१, तर ग्रामीण क्षेत्रातील ७० तलाठी सजांचा समावेश आहे. आजही एका तलाठ्यांकडे दोन ते तीन गावे आहेत.

आपत्ती काळात शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे, सात-बारावरील विविध नोंदी या कामासाठी तलाठ्यांवर ताण येत होता. ही पदे मंजूर झाल्याने हा ताण कमी होऊन कामेही वेगाने आणि वेळेत होतील.

तालुकानिहाय तलाठी सजा, मंडल संख्या

तालुका  तलाठी सजा  मंडल
उत्तर सोलापूर    २५    ४
बार्शी     ७  ...
पंढरपूर    १२   २
मोहोळ    ८   
सांगोला    १   ...
दक्षिण सोलापूर    ३   
अक्कलकोट    ६   १
मंगळवेढा   ३    १
माळशिरसला    ५   १
माढा    १२    २
करमाळा    ३०    ५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT