Sindkhed Lapali became a smart village in Buldana district
Sindkhed Lapali became a smart village in Buldana district 
मुख्य बातम्या

सिंदखेड लपाली बनले बुलडाण्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम 

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली गावाची जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून निवड झाली आहे. ४० लाख रुपयांचा पुरस्कार या गावाला मिळणार आहे. तर यापूर्वी तालुकास्तरावरील १० लाखांचा पुरस्कार मिळवून गावाने तब्बल ५० लांखाची कमाई केली आहे. 

जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम निवडण्यासाठी जिल्ह्यातील तेरा तालुक्यांतील प्रत्येकी एका गावात चुरस तयार झाली होती. त्यामध्ये सिंदखेड लपाली गावाचा समावेश होता. जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम विजेता सिंदखेड गावाला चाळीस लाखांचे बक्षीस मिळणार आहे. यापूर्वी या गावाने एकीच्या जोरावर सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत राज्यस्तरीय द्वितीय बक्षीस मिळवून जिल्ह्याचे नाव राज्यात मोठे केले होते. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अतिरिक्त सीईओ राजेंद्र लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे तसेच कार्यकारी अभियंता परदेशी, मोताळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण मोहोड, पंचायत विस्तार अधिकारी दीपक माडीवाले, नारायण राऊत यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. 

ग्रामपंचायत सचिव राजेंद्र वैराळकर, सरपंच विमल कदम, उपसरपंच अशोक माळेकर, तसेच सदस्य ज्योती मोरे, ईश्वर लवांडे, किशोर गडाख, रेखा खराते, सुरेखा पवार, प्रवीण जाधव, मनीषा भुसारी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष ज्ञानदेव गडाख यांनी सातत्याने पुढाकार घेतला. सिंदखेड लपाली गावाने स्पर्धेत ७२ गुण मिळवले. 

या क्षेत्रात केले काम  पाणी पुरवठा, आरओ स्थापना, वृक्ष लागवड, करवसुली, शौचालय सुविधा, पाणी गुणवत्ता, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा, प्लास्टिक बंदी, पाणी पुरवठा वीज बिल नियमित भरणा, महिला व बालकल्याण खर्च, अपंग खर्च, ग्रामसभा, सामाजिक दायित्व, सौर दिवे, एलईडी वापर, बायोगॅस, गार्डन, बायोलॉजिकल गार्डन, संकेतस्थळ, सुधारित तंत्रज्ञान वापर, सैनिटरी नॅपकिन मशीन, संगणक वापर, भूमिगत नाली, गावात दिशादर्शक फलक, संगणक उपयोग, व्यायाम शाळा, तर श्रमदानातून सीसीटी, माती नाला बांध, एलबीएस, कांटुर बंडींग, कंपार्टमेंट बंडीग, गाबियान अशी कामे करण्यात आली आहे. तसेच संगणक आज्ञावली वापर, संगणकद्वारे सुविधा, ऑनलाइन सुविधा अशा उद्दिष्टांची पूर्तता सिंदखेड ग्रामपचायतीमार्फत केली आहे. त्याशिवाय गांडूळखत प्रकल्प, तसेच क्रीडा महोत्सव, प्रबोधन व्याख्याने, शेतकरी दौरे करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT