सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला  
मुख्य बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग ः  सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी (ता. २१) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. काही भागांत जोरदार सरी कोसळत असून काही भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान भातलावणीची ९० कामे पूर्ण झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी नाचणी लागवडीला सुरवात केली आहे. जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून किरकोळ पाऊस सुरू होता. पाच ते दहा मिनिट पाऊस झाल्यानंतर दिवसभर कडक उन्ह असेच चित्र मागील काही दिवसांत पाहायला मिळत होते. परंतु, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्री पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या. सोमवारी (ता. २२) सकाळी सुध्दा काही भागांत पावसाच्या दमदार सरी कोसळल्या तर काही भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील भातलावणीचे काम अतिंम टप्प्यात असून आत्तापर्यंत ९० टक्के लावणी पूर्ण झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत भातलावणीची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी नाचणी रोपे लागवडीला सुरवात केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT