मुख्य बातम्या

एकात्मिक पीक पद्धतीत रेशीमचे स्थान अढळ

टीम अॅग्रोवन

जालना : रेशीम उद्योगातील देशांतर्गत संधी पाहता भविष्यातील एकात्मिक पीक पद्धतीमध्ये रेशीम शेतीचे स्थान अढळ असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद जिल्हा रेशीम कार्यालयातील प्रकल्प अधिकारी अजय मोहिते यांनी केले.

जालना येथील आझाद मैदानावर सकाळ-अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात रेशीम शेती व्यवस्थापन आणि संधी या विषयावर ते बोलत होते. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडिया तसेच कृषी विभाग जालना व आत्मा जालना या कृषी प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.

श्री. मोहिते म्हणाले, महाराष्ट्र रेशीम उत्पादनातील अपारंपरिक राज्य म्हणून ओळखले जाते. पारंपरिक राज्याच्या ओळीतील काही राज्यांच्या तुलनेत रेशीमचे क्षेत्र कमी असूनही महाराष्ट्राची उत्पादकता मात्र जास्त आहे. देशाची रेशीमची गरज ३८ हजार टनांची तर उत्पादन ३० हजार टनांचे आहे. याचा अर्थ आपल्याला ८ हजार मेट्रिक टन रेशीमची गरज भागविण्यासाठी इतर उत्पादक देशांवर अवलबून राहावे लागते.

जागतिक स्तरावर चीन हा रेशीमचा जवळपास ८४ टक्के उत्पादन घेणारा देश आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशांना रेशीमची गरज भागविण्यासाठी चीनवर निर्भर राहावे लागते. आपल्या देशाची रेशीम गरज भागवायची म्हटली तरी आज हजारात असलेले तुतीचे क्षेत्र काही लाख एकरात होणे आवश्यक आहे.

उत्पादनाची गरज पाहता रेशीमचे आज असलेले दर आणखी किती काळ शाश्वत राहतील याचा अंदाज येईल. त्यामुळे उत्पादनासोबतच शाश्वत उत्पादन देणारे क्षेत्र म्हणून रेशीमकडे पाहता येईल, असेही श्री. मोहिते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT