‘सिद्धेश्‍वर'ची चिमणी अखेर पाडणार
‘सिद्धेश्‍वर'ची चिमणी अखेर पाडणार 
मुख्य बातम्या

‘सिद्धेश्‍वर'ची चिमणी अखेर पाडणार

टीम अॅग्रोवन

सोलापूर : होटगी रस्त्यावरील विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीच्या संरक्षणाची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी हटविण्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांना केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी या चिमणीबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे पत्र दिले आहे. परंतु हे पत्र अद्यापपर्यंत मिळाले नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने नव्याने उभारलेल्या चिमणीमुळे होटगी रस्त्यावरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यात अडथळा येत असल्याबाबतचा अहवाल एअरपोर्ट ॲथॉरिटीकडून शासनाला देण्यात आला होता.

चिमणी हटविण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया हाती घेतल्यानंतर सुरवातीला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदत दिली. त्यानंतर कारखान्यातील कामगार युनियन व शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने मागील महिन्यात स्थगितीबाबत याचिका फेटाळून लावत कारवाईला परवानगी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Government Contractor Movement : सर्व विभागांतील कंत्राटदारांचे ७ मेपासून काम बंद आंदोलन

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT