माजलगांवात शिवसेनेचा तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा
माजलगांवात शिवसेनेचा तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा 
मुख्य बातम्या

माजलगांवात शिवसेनेचा तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

माजलगांव, जि. बीड :  बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या कापसाचे पंचनामे करून शेतक-यांना तात्काळ मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने तहसिल कार्यालयावर बुधवारी (ता. २०)  बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.    तालुक्यातील कापसावर बोंडआळीचे मोठे आक्रमण झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाचे नुकसान झाले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शेतकर्‍यांना हेक्टरी 75 हजार रूपये द्यावे, शेतीमाल खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया रद्द करा, लागवड करण्यात आलेल्या 265 जातीच्या ऊसाची पक्की नोंद घ्यावी, ऊसाला प्रतिटन 3 हजार रूपये भाव द्यावा, गाळप झालेल्या ऊसाचे 15 दिवसांत पैसे द्यावेत यांसह विविध मागण्यांसाठी तालुका शिवसेनेच्या वतीने आज सिंदफणा नदी पूल परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौकामार्गे तहसिल कार्यालयावर शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील नित्रुड, पात्रुड, तेलगांव, लोणगांव, घळाटवाडी, पवारवाडी, आनंदगांवक, शुक्लतिर्थ लिमगांव, मोगरा यासह विविध गावातील शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. मोर्चास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT