Shivsena front to demand compensation in Nagar
Shivsena front to demand compensation in Nagar 
मुख्य बातम्या

नगर : नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शिवसेनेचा मोर्चा

टीम अॅग्रोवन

नगर : नगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, पीक नुकसानीचे राहिलेले पंचनामे करावेत या मागण्यांसाठी नगर तालुका शिवसेनेच्या वतीने सोमवारी (ता. २५) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, तसेच ठिय्या आंदोलन करीत तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

नगर जिल्ह्यात ‘क्यार’ चक्रीवादळामुळे खरिपाच्या अखेरीस व रब्बीच्या सुरुवातीस संततधार तसेच काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. यामुळे खरिपातील काढणी झालेल्या कांदा, सोयाबीनसह फळबागांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

खरिपातील कोणतेही पीक हाती आले नाही. काही ठिकाणी सोयाबीन, कांदा, भुईमूग ही पिके लवकर काढली गेली. पंचनामा करतेवेळी ही पिके शेतात नसल्याने पंचनामे झाले नाहीत. उदाहरण द्यायचे झाले तर माझ्या शेतातील चार एकरांवरील भुईमुगाचा पंचनामा पीक शेतात नसल्यामुळे केला गेला नाही असे संदेश कार्ले यांनी तहसीलदार पाटील यांना सांगितले. ८ व ९ ऑक्टोबरला तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने फलोत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु शासनाने कोणत्याच शेतकऱ्यांचे पंचनामे केले नाहीत. हे सर्व शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत.

वास्तविक पाहता १८ नोव्हेंबरच्या शासन निर्णयामध्ये फळबागधारक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर केली गेली. परंतु केवळ पंचनाम्याअभावी त्यांना ती मदत सध्या मिळणार नाही. या सर्व बाबींचा विचार करता एक तर ओला दुष्काळ जाहीर करावा किंवा राहिलेले पंचनामे करावेत व अडचणीत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आहे.

निवेदन देतेवेळी पंचायत समिती सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, अनिल कराळे, उपसभापती प्रवीण कोकाटे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, डॉ. दिलीप पवार, संदीप गुंड, गुलाब शिंदे, प्रवीण गोरे, विश्वास जाधव, बाबासाहेब ससे, संजय भापकर, सत्यवान कोतकर, जालिंदर वाघ, बाळासाहेब कराळे, दत्ता सकट, बाळासाहेब खांदवे, नरेश पवार, प्रवीण गोरे, किरण वामन, रवींद्र मस्के, सुभाष कराळे उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT