मुख्य बातम्या

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर शिवसैनिकांचे अभिवादन

टीम अॅग्रोवन

मुंबई  ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी (ता. १७) शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळी राज्यभरातील शिवसैनिकांनी गर्दी केली. या वेळी विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनीही स्मृतिस्थळाला भेट देत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. विशेषतः राज्यात होऊ पाहत असलेल्या सत्तासमीकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपव्यतिरिक्त शिवसेनेचे नवे मित्र असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेही बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर पोचले होते. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रविवारी ७ वा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने राज्यभरातील शिवसैनिकांनी शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना आदरांजली वाहिली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले.

शिवसेना आमदारांसह काँग्रेसचे नेतेही बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर पोचले होते. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी स्मृतिस्थळी भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल माध्यमाद्वारे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला. समाजकारणाला अग्रक्रम देणारे राजकारण, अमोघ वक्तृत्व, रोखठोक स्वभाव यामुळेच त्यांना अनुयायांचे निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळाले. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. या वेळी विनोद तावडे, पंकजा मुंडे उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेही बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT