Shiv Sena allegation for power supply in front of the office of Mahavidyar in Parbhani
Shiv Sena allegation for power supply in front of the office of Mahavidyar in Parbhani 
मुख्य बातम्या

परभणीत कृषिपंपांना वीजपुरवठ्यासाठी शिवसेनेचे धरणे

टीम अॅग्रोवन

परभणी : जिल्ह्यातील कृषिपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा व्हावा, यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रोहित्र उपलब्ध करून द्यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता.१६) वीज महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 

वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे जिल्ह्यातील कृषिपंपांना योग्य दाबाने वीज पुरवठा होत नाही. यंदाच्या खरीप पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. विहिरींसह सिंचन स्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी आहे. परंतु, योग्य दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याची स्थिती आहे. 

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे रोहित्र उपलब्ध करून द्यावेत. अनेक गावांचा खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करावा. घरगुती वापराची विजबिलांची योग्य पद्धतीने आकारणी करून देत वेळेवर वसुली करावी. दुष्काळामुळे कृषिपंपाची वीजबिल वसुली स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वसुलीसाठी नाहक त्रास देऊ नये, आदी मागण्यासांठी खासदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, बाजार समितीचे संचालक गंगाप्रसाद आणेराव, सदाशिव देशमुख, अर्जुन सामाले आदीसह कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT