शेतकरी रास्तारोको
शेतकरी रास्तारोको 
मुख्य बातम्या

दूध दरवाढ द्यावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा शेतकरी संघटनेचा इशारा

टीम अॅग्रोवन

पंढरपूर, जि. सोलापूर  ः सरकारने अनेक वेळा आश्‍वासन देऊनही शेतकऱ्यांना दूध दरवाढ मिळाली नाही. त्यामुळे सरकार व दुग्ध विकासमंत्र्यांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विश्‍वासघात झाला आहे. एक जानेवारीपासून शेतकऱ्यांना दूध दरवाढ द्यावी, अन्यथा सरकारच्या विरोधात सुकाणू समितीच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर यांनी शनिवारी (ता. ३०) दिला. गाईच्या दुधाला तीस रुपये व म्हशीच्या दुधाला ५० रुपये प्रती लिटर दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पिलीव (ता. माळशिरस) येथे शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान श्री. घाटणेकर यांनी राज्य सरकारच्या दूध धोरणावर टीकास्त्र सोडले. यावेळी श्री. घाटणेकर म्हणाले, शेतीमालाला हमीभाव नाही, उसाला कारखाने योग्य दर देत नाहीत, म्हणून शेतकरी दूध उत्पादनाकडे वळले आहेत. आता दुधालाही दर मिळत नसल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला दरवाढ मिळावी यासाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन केले जाईल. यावेळी माऊली हळणवर, प्रा. जयंत बगाडे, अजित बोरकर, माऊली जवळेकर, रमेश पाटील आदींची भाषणे झाली. या वेळी शहाजहान शेख, माळशिरस अजित बोरकर, धनंजय मदने आदीं उपस्थित होते.  आंदोलनादरम्यान दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. स्थानिक पोलिस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात गारपीटीचा अंदाज; राज्यातील विविध भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

Sugar Price Hike : ऐन निवडणुकीत साखरेच्या दरात तेजी, क्विंटलचा दर वाढल्याचा कोणाला फायदा?

Animal Ear Tagging : जनावरांचे टॅगिंग न केल्यास खरेदी-विक्रीला रोख लागणार

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने नागपूर, भंडारा आणि चंद्रपुरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

Chilli Cultivation : धाड परिसरात शेकडो हेक्टरवर यंदा झाली मिरचीची लागवड

SCROLL FOR NEXT