Chilli Cultivation : धाड परिसरात शेकडो हेक्टरवर यंदा झाली मिरचीची लागवड

Chilli Farming : खरीप हंगामातील सोयाबीन पिकामधून काहीच हातामध्ये येत नसल्याने शेतकऱ्यांनी या पिकाची वाट न पाहता धाड परिसरासह तालुक्यामध्ये शेकडो हेक्टरवर ठिबक व मलचिंग पेपरच्या माध्यमातून मिरची लागवड केली आहे.
Chilli Farming
Chilli FarmingAgrowon

Buldhana News : खरीप हंगामातील सोयाबीन पिकामधून काहीच हातामध्ये येत नसल्याने शेतकऱ्यांनी या पिकाची वाट न पाहता धाड परिसरासह तालुक्यामध्ये शेकडो हेक्टरवर ठिबक व मलचिंग पेपरच्या माध्यमातून मिरची लागवड केली आहे. या भागात पहिल्यांदाच मिरचीची लागवड वाढली आहे.

Chilli Farming
Chilli Cultivation : विक्रमगडमध्ये मिरची लागवड वाढली

खरीप व रब्बी हंगामातील पिकांमधून पेरणीचा खर्चही निघालेला नव्हता. शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील सोयाबीन पीक हे महत्त्वपूर्ण आहे. मात्र, यावर्षी अल्प प्रमाणात पडलेला पाऊस, पिकावर येलो मोझॅक संकट आल्याने सोयाबीन पीक नामशेष झाले होते. हातात आलेल्या थोड्याफार सोयाबीनला भावही मिळाला नाही.

पर्यायाने खरीप तोट्याचा राहला. रब्बीतील हरभरा पीक विविध रोग व अवकाळीच्या तडाख्यात सापडले. शेतकऱ्यांनी पुढील खरीप हंगामातील पिकांची आस न धरता यावेळी वेगळा प्रयोग अंगिकारला आहे. यावर्षी ठिबकवर तीन हजार हेक्टरपर्यंत मिरची लागवड केल्याचे सांगितले जाते. यामध्ये विशेष करून तरुण व सुशिक्षित शेतकऱ्यांचा पुढाकार लक्षणिय आहे.

Chilli Farming
Red Chilli Market : कळमना बाजारात लाल मिरचीची आंध्र प्रदेश, तेलंगणातून आवक

धाडसह सावळी, करडी, कुंबेफळ, मासरुळ, वरुड, सोयगांव, डोमरुळ, धामणगांवसह अनेक गावातील शेतकरी भाजीपाला लागवड करीत असतात. यामध्ये कोथिंबीर, पालक, फुलकोबी, मिरची लागवड नेहमीच करतात. यावेळी प्रथमच तरुण शेतकऱ्यांनी एक धाडशी निर्णय घेत ठिबक व मलचिंग पेपरच्या साह्याने तब्बल तीन हजार हेक्टरवर मिरचीची लागवड केली आहे. यासोबतच पोपटवाल, कोबी, कोथिंबिरीची लागवड केली आहे.

नागपूर बाजारपेठेत दबदबा

धाड भागातून वाल, मिरची, वांगे, सिमला मिरची, पानकोबी मोठ्या प्रमाणात नागपूर येथे विक्रीसाठी पाठवण्यात येते. हंगामात या भागातून दररोज वाहने भरून हा माल नागपूरला नेला जातो. शेतकऱ्यांना या माध्यमातून पांरपारिक पिकांपेक्षा अधिक मिळकतही होते.

मी माझ्या सात एकरात सोयाबीनची लागवड केली होती. येलो मोझॅकमुळे सोयाबीनचे पीक वाळले होते. थोड्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन झाले. मात्र सोयाबीनला अतिशय कमी प्रमाणात भाव मिळाला. त्यामुळे बियाण्याचाही खर्च निघाला नाही. मी वाल व मिरचीची लागवड केली.
प्रदीप तायडे, शेतकरी, करडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com