मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा उतरविणार
मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा उतरविणार  
मुख्य बातम्या

मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा उतरविणार

वृत्तसेवा

औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका चालविण्याऱ्या मेंढपाळांची संख्या मोठी आहे. विविध समस्यांना सामोरे जाणाऱ्या मेंढपाळांसाठी लवकरच ८० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा उतरविण्यात येणार आहे. याचा लाभ प्रत्येक मेंढपाळाला दिला जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास विभाग    मंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी (ता.१३) येथे दिली.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ पुणेअंतर्गत मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पडेगाव येथे मेष व लोकर सुधार योजनेअंतर्गत मेंढपाळ कार्यशाळचे आयोजन, तसेच राज्य योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या शेंळ्या-मेंढ्यांचे आधुनिक शेडचे उद्घाटन व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेळ्या-मेंढ्यांसाठी शेड बांधकामाचे भूमिपूजन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी मंत्री जानकर म्हणाले की, बंदीस्त शेळीपालनासाठी राज्य शासनाने ५० कोटी रुपयांची राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सुरू केली आहे. या योजनेचा सर्व मेंढपाळ, तसेच धनगर समाजातील बांधवांनी लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी. सर्व मेंढ्या-शेळ्यांचे संपूर्ण लसीकरण करून त्यांना आजारापासून दूर ठेवा. आपल्या मुला-मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची गोडी लावावी.  आंतरराष्ट्रीय स्तरावर मेंढ्यांच्या लोकरापासून तयार वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील मेंढपाळांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात शेडची उभारणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील तिन्ही महामंडळे हे फायद्यात असून, शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सूत्रसंचालन डॉ. राजशेखर दडले यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT