शरद पवार
शरद पवार 
मुख्य बातम्या

दुष्काळग्रस्त भागासाठी सर्वंकष निर्णय घ्या : शरद पवार

टीम अॅग्रोवन

मुंबई  ः सातारा, सोलापूर, बीड, नगर या जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून लक्ष घालावे आणि दुष्काळग्रस्त भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळही श्री. पवार यांनी या पत्राद्वारे मागितली आहे.

शरद पवार यांनी लोकसभेचा रणसंग्राम संपताच सोलापूर, सातारा, बीड, उस्मानाबाद, नगर या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. थेट बांधावर जात तसेच चारा छावण्यांतील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शिवाय धनगर समाजातील प्रतिनिधींनी शेळ्या, मेंढ्यांसाठी चारा छावणीच्या धर्तीवर स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली आहे, त्यांच्या दृष्टीने तो दिलासा ठरेल असेही श्री. पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

शरद पवार यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतलेल्या समस्या, त्यांच्या अडचणींवर उपाययोजना काय करायला हव्यात या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात प्रत्येक मुद्दा आणि समस्या तसेच दुष्काळावर काय उपाययोजना करायला हव्यात याबाबतचे सविस्तर म्हणणे मांडले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT