sharad pawar
sharad pawar  
मुख्य बातम्या

नुकसानीची शरद पवारांकडून पाहणी

टीम अॅग्रोवन

मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आढावा घेतला जात असून या पाहणीसाठी ते मंगळवारपासून (ता.९) कोकण दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी सुरुवातीला रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे पोहोचून परिस्थितीची माहिती घेतली. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. या वेळी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून शरद पवारांनी परिस्थिती जाणून घेतली. शरद पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेत आहेत. आज (ता.१०) जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत. निसर्ग या चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे, आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकण दौरा केला. तसेच १०० कोटींची तातडीची मदत त्यांनी जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेव्हा रायगड दौरा केला तेव्हा त्यानंतर लगेचच त्यांच्यात आणि शरद पवारांमध्ये एक तातडीची बैठक झाली होती. कोकणातल्या नुकसानग्रस्तांना पुन्हा कसे उभे करायचे यावर चर्चा झाली. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि इतर जिल्ह्यांतील शेतीचे झालेले नुकसान कसे भरून काढायचे, तसेच कोकणातल्या फळबागांना विशेष मदत देऊन या फळबागा उभ्या करण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजले होते. आता या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या कोकण दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांसोबत बैठक शरद पवार यांनी माणगाव, म्हसळा, दिवेआगार, श्रीवर्धन येथील दौरा करून निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसनीची पाहणी केली. त्यानंतर ४ वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता हरिहरेश्वर आणि नंतर ६ वाजता बागमांडला मार्गे दापोली येथे. दापोली येथे शरद पवार यांनी मुक्काम केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT