गोलीवडे (ता. पन्हाळा) ग्रामस्थांतर्फे ग्रामदैवत भैरवनाथांची दीड किलो वजनाची चांदीची मूर्ती देऊन शरद पवार यांचा गौरव करण्यात आला.
गोलीवडे (ता. पन्हाळा) ग्रामस्थांतर्फे ग्रामदैवत भैरवनाथांची दीड किलो वजनाची चांदीची मूर्ती देऊन शरद पवार यांचा गौरव करण्यात आला. 
मुख्य बातम्या

कोल्हापुरातून लढण्याचे बळ मिळाले : शरद पवार

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : माझ्या आयुष्यात अनेक चढउतार आले. यामध्ये लढण्याचे बळ हे कोल्हापुरातून मिळाले यात माझ्या मामाच्या गावचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गोलीवडे (ता. पन्हाळा) येथे केले. श्री. पवार यांनी रविवारी (ता. ११) गोलीवडे (ता. पन्हाळा) या त्यांच्या मामाच्या गावाला भेट दिली. ग्रामस्थांतर्फे त्यांचा ग्रामदैवत भैरवनाथांची दीड किलो चांदीची मूर्ती देऊन गौरव झाला. सत्कारानंतर बोलताना मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली, अशी मिश्‍किल टिप्पणी पवार यांनी केली. दिलखुलास संवाद साधला. पवार यांच्या स्वागतासाठी कोतोली फाट्यापासून स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. गावात तर गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा झाला. पवार यांच्या आई शारदाबाई पवार यांचा जन्म या गावातील भोसले कुटुंबामध्ये झाला. भोसले कुटुंबीय काही वर्षांनी कोल्हापूरला वास्तव्यास गेले; परंतु ही आठवण पवार यांना माहिती असल्याने त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात या गावाला एकदा भेट देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार या दौऱ्यात त्यांनी ही भेट दिली. गावात सकाळपासूनच पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. गावातील महिलांनी हिरव्या साड्या परिधान केल्या होत्या, तर पुरुषांनी कोल्हापुरी फेटे बांधले होते. तरुणांनी झांजपथकाच्या निनादात त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, निवेदिता माने, आमदार हसन मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

SCROLL FOR NEXT