Sharad Pawar to hold meeting on organic farming
Sharad Pawar to hold meeting on organic farming 
मुख्य बातम्या

सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठक

टीम अॅग्रोवन

पुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त शेतीचा सर्वांगीण विकास होण्याची गरज आहे. त्यासाठी राज्याचे कृषी, सहकार व पणन मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर लवकरच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार बैठक घेणार असल्याची माहिती महाआॅरगॅनिक ॲन्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन(मोर्फा)चे सचिव प्रल्हाद वरे यांनी दिली.

बारामती येथे गोविंद बागेत श्री. पवार यांनी सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त शेतीबाबत रविवारी (ता. २) बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार अमरसिंह पंडित, ज्येष्ठ नेते सदाशिव सातव, ‘मोर्फा’चे अध्यक्ष अंकुश पडवळे, सचिव प्रल्हाद वरे, संचालक अमरजित जगताप, विजय तावरे, रोहित अहिवळे उपस्थित होते.

श्री. पडवळे म्हणाले, की राज्यात सेंद्रिय शेतीला मोठा वाव आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारचे धोरण असावे आणि सेंद्रिय, रासायनिक अवशेषमुक्त शेतीमालाला किफायतशीर मार्केट मिळावे, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त उत्पादनांच्या विपणनासाठी कृषी, सहकार व पणन विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. त्या अनुषंगाने या विभागांची मदत घेऊन नवीन धोरण आखण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

श्री. वरे म्हणाले, की रासायनिक अवशेषमुक्त निर्यातक्षम भाजीपाला व फळांचे क्लस्टर राज्य सरकारने तयार करावे, शेतकरी कंपन्यांना लवकर मदत मिळावी. त्यासाठी राज्य पातळीवर एखादा विभाग तयार करता येईल का याचा विचार करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा. या पद्धतीने शेती करणारे शेतकरी मार्केटिंगमध्ये कमी पडतात. त्यामुळे शेतकरी व ग्राहक यांच्यात दुवा साधण्याचे काम राज्य सरकारने करावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते श्री. पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT