Shahu Krishi Mahavidyalaya employees' agitation
Shahu Krishi Mahavidyalaya employees' agitation 
मुख्य बातम्या

शाहू कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. २७) आंदोलन केले.

अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसहीत सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आलेला नाही. तो लागू व्हावा यासाठी हे आंदोलन झाले. सकाळी दहा वाजता मुख्य इमारतीसमोर सामाजिक अंतर राखत कर्मचारी एकत्र आले. काळ्या फिती लावून श्रमदान करत आयोग लागू करण्यास विलंब होत असल्याचा निषेध करण्यात आला.

समन्वय संघाच्या वतीने डॉ. अशोक पिसाळ, डॉ. संग्राम धुमाळ, डॉ. ज्योती यादव, डॉ. पुष्पांजली भोसले यांनी तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ. पांडुरंग मोहिते यांनी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे व सहायक कुलसचिव रमेश लोखंडे यांना मागणीचे निवेदन दिले. कृषी महाविद्यालये, विभागातील सर्व कृषी संशोधन केंद्र, व तंत्र महाविद्यालयातील कर्मचारी यात सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT