राज्यात एफआरपीचे ७७ टक्के वितरण
राज्यात एफआरपीचे ७७ टक्के वितरण 
मुख्य बातम्या

राज्यात एफआरपीचे ७७ टक्के वितरण

ॲग्रोवन वृत्तसेवा

पुणे : साखर कारखान्यांकडे लक्षावधी टन साखर पडून असल्याने आर्थिक ताण असतानाही आतापर्यंत ७७ टक्के एफआरपी अदा केली आहे. त्यामुळे सात हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.    राज्यातील १८२ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून ४२२ लाख २३ हजार टन ऊस डिसेंबरअखेर खरेदी केला होता. एफआरपी कायद्यानुसार शेतकऱ्यांना १४ दिवसांच्या आत ९ हजार १४८ कोटी रुपये देणे बंधनकारक होते. आर्थिक ताण असून कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंत यातील सात हजार ११८ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. एफआरपीचे वितरण बघता ११५ कारखान्यांनी दोन हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम थकवली आहे. ही रक्कम देय एफआरपीच्या २२ ते २३ टक्क्यांच्या आसपास आहे. ६७ कारखान्यांनी मात्र १०० टक्के एफआरपी दिली आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.  गेल्या हंगामात याच कालावधीपर्यंत १३६ कारखान्यांनी अवघे दोन हजार ९६० कोटी रुपये शेतकऱ्यांना एफआरपीपोटी दिले होते. म्हणजेच यंदा कारखान्यांनी आतापर्यंत चार हजार कोटी रुपये गेल्या हंगामापेक्षा जादा दिलेले आहेत. गेल्या हंगामात याच कालावधीपर्यंत राज्यातील ८८ कारखान्यांनी ९६९ कोटी रुपयांची एफआरपी थकवले होते. यंदा ही संख्या वाढली आहे.  गेल्या वर्षीचे ३४३ कोटी थकीत मागील हंगामातील एफआरपीचे ३४३ कोटी रुपये मात्र अजूनही शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. ही रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना देणे बंधनकारक राहील. गेल्या हंगामात देखील जुन्या थकीत एफआरपीचा आकडा ३८४ कोटींच्या आसपास होता. यंदा तो ४० कोटी रुपयांनी कमी दिसतो आहे. दृष्टिक्षेपात साखर हंगाम

  • १८२ साखर कारखान्यांकडून ४२२ लाख २३ हजार टन ऊसगाळप
  • १५ जानेवारीपर्यंत यातील सात हजार ११८ कोटी वितरीत
  • ११५ कारखान्यांनी दोन हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम थकवली 
  • ६७ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT