अमरावती जिल्ह्यात निकृष्ट बियाणे प्रकरणी ७७ लाखांची भरपाई
अमरावती जिल्ह्यात निकृष्ट बियाणे प्रकरणी ७७ लाखांची भरपाई 
मुख्य बातम्या

अमरावती जिल्ह्यात निकृष्ट बियाणे प्रकरणी ७७ लाखांची भरपाई

टीम अॅग्रोवन

अमरावती : निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना उगवण विषयक समस्येचा सामना करावा लागला होता. या प्रकरणात अद्यापपर्यंत कंपन्यांद्वारे ८६७ सोयाबीन बॅग व ७७ लाख रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली.

खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांना सोयाबीनच्या निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा झाला. त्यामुळे अमरावतीसह राज्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांच्या बियाणे संदर्भाने लाखो तक्रारी झाल्या. एकट्या अमरावती जिल्ह्यात ४७३२ शेतकऱ्यांनी सुमारे पन्नास हजार हेक्‍टरवरील बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या.

शासनाच्या आदेशानुसार कृषी विभागाने या तक्रारींची नोंद घेत पंचनाम्याची कारवाई केली. यातील ३०४८ तक्रारी मध्ये तथ्य आढळून आले. त्याच्या परिणामी कृषी विभागाने कंपन्यांशी संपर्क साधत त्यांना शेतकऱ्यांना परतावा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कंपन्यांकडून ८६७ बॅग ७७ लाख रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यात एकूण ७३ बियाणे कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या.   अठरा कंपन्यांविरुद्ध कारवाई बियाणे नियम १९६८ मधील २३ (ए) (२) या तरतुदीनुसार कृषी विभागाने १८ बियाणे कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबिला आहे. सुरवातीला शेतकऱ्यांनी बियाणे उगवण विषयक तक्रारी केल्यानंतर भरपाई देण्यात यावी की कारवाई करावी अशी संभ्रमावस्था होती. त्यानंतर शासनाकडून कारवाईचे निर्देश देण्यात आले.

प्रतिक्रिया... महाबीज कडून २८.७७ लाख रुपये व ३२७ बॅग बियाणे परतावा देण्यात आला. खासगी कंपन्यांकडून ५४० बॅग व ४८.२४ लाखाची भरपाई देण्यात आली. भरपाई नाकारणाऱ्या अठरा प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. -विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. तक्रारी : ४७३२ भरपाई प्राप्त शेतकरी : ११७९ भरपाईपासून वंचित : ३५५३ बियाणे दोष प्रकरणे : ३०४८ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT