केळीवेळीत सातशे एकरांतील पिके पाण्याखाली
केळीवेळीत सातशे एकरांतील पिके पाण्याखाली 
मुख्य बातम्या

केळीवेळीत सातशे एकरांतील पिके पाण्याखाली

टीम अॅग्रोवन

अकोला ः गेले चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे केळीवेळी परिसरातील दोन्ही नाल्यांना पूर वाहिला. भोपळी व लेंडी नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने ७०० एकरांतील पिके धोक्यात आलेली आहेत.  केळीवेळी येथील भोपळी व लेंडी नाल्याच्या दोन्ही बाजूच्या शेतांमधील खरिपाची पिके खरडून गेली. तर उर्वरित पिके कुजली आहेत. ज्या शेतांमध्ये पाणी साचले आहे त्या ठिकाणी एक महिना शेतीची कामे होण्याची चिन्हे नाहीत. शेतात साचलेले पाणी जमिनीत मुरले तरी पुन्हा पाऊस आल्यास पाणी साचण्याची चिन्हे आहेत. या भीतीपोटी शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. ज्या वर्षी जास्त पाऊस पडतो त्यावर्षी या खारपाण पट्ट्यात हमखास नुकसान होत असते. शेतांमध्ये पाणी साचू नये, यासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न होण्याची गरज आहे. सध्या पाणी साचलेल्या शेतांमधील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे.

दुबार पेरणीही मावळली  केळीवेळी शेतशिवारात पाणी साचलेले असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकटामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. साचलेल्या पाण्यामुळे शेतात असलेली खरिपाची पिके कुजली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणीशिवाय पर्याय उरलेला नाही. परंतु, आता ऑगस्ट सुरू असल्याने दुबार पेरणी करणेही शक्य होणार नसल्याची चिन्हे आहेत. खरिपाचा मोठा कालावधी निघून गेला आहे.

२०१६ ची पुनरावृत्ती जुलै २०१६ मध्ये या भागात अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवली होती. तेव्हापासून या शेतकऱ्यांनी तसेच कृषी खात्याने आजपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नाही. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसुद्धा मिळालेली नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT