Sell ​​Homemade Vegetables from WhatsApp Group
Sell ​​Homemade Vegetables from WhatsApp Group 
मुख्य बातम्या

वसमतमध्ये व्हाॅट्सअॅप ग्रुपवरून घरपोच भाजीपाला विक्री

टीम अॅग्रोवन

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उत्पादनांच्या मार्केटींग तसेच विक्रीसाठी सेंद्रिय ग्राहक मंडळ या नावाने व्हॅाटसअॅप ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपव्दारे सेंद्रिय भाजीपाला, डाळी, हळद पावडर, कच्ची हळद, गूळ पाक, खपली गहू, घाण्याचे तेल आदी उत्पादनांची आठवड्यातील तीन दिवस घरपोच विक्री केली जाते. परंतु सध्या ‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आठवड्यातून एक दिवस घरपोच भाजीपाला विक्री केली जात असून ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोचवितांना योग्य ती दक्षता घेतली जात आहे.

वसमत तालुक्यातील पांगरा सती येथील संजय शिंदे, ममदपूरवाडी येथील डॅा. हरिदास जटाळे, लिंगी येथील बालाजी यशवंते, हयातनगर येथील गंगाधर साखरे या शेतकऱ्यांच्या संकल्पनेतून सुमारे पाच वर्षापूर्वी सेंद्रिय ग्राहक मंडळ या नावाने व्हॅाटसअॅप ग्रुपची स्थापना करण्यात आली. त्यात धानोरा (ता. वसमत) येथील शेतकरी दादाराव राऊत यांच्यासह पाच शेतकरी ग्रुपमध्ये दोन अडीच वर्षापूर्वी सहभागी झाले. या ग्रुपमध्ये वसमत शहरातील नियमित सेंद्रिय शेतमाल व प्रक्रिया उत्पादने खरेदी करणाऱ्या 80 ते 85 ग्राहकांचा समावेश आहे.

या ग्रुपवर दररोज शेतातील उत्पादनाची माहिती टाकली जाते. त्यानंतर ग्राहक मागणी करतात. त्यानुसार दादाराव राऊत आणि त्याचा मुलगा योगेश राऊत हे आठवड्यातील तीन दिवस भाजीपाला तसेच अन्य प्रक्रिया उत्पादने घरपोच पोचवतात. या ग्रुपवर अन्य कुठल्याही पोस्ट टाकल्या जात नाहीत. दर्जेदार सेंद्रिय शेतमाल उत्पादने, भाजीपाला घरपोच मिळत असल्यामुळे अनेक ग्राहक सेंद्रिय ग्राहक मंडळ गटाल जोडले गेले आहेत.

ग्राहकांना वर्षातील बारा महिने 365 दिवस भाजीपाल्याचा पुरवठा करण्याचा करार केलेला असतो. त्यामुळे बाजारभावातील घसरणीमुळे नुकसान होत नाही. भाजीपाल्यास बारमाही 60 रुपये प्रतिकिलो याप्रमाणे दर मिळतो. शेतकरी भेंडी, गवार, चवळी, शेपू, पालक, वांगी, वाल, मेथी, कोथिंबिर, कारले, दोडके असे भाजीपाल्यामध्ये वैविध्य ठेवून वर्षभर उत्पादन घेतात. सेंद्रिय हळद पावडर, कच्ची हळद, खपली गहू, बन्सी गहू, मूग, तूर, हरभरा आदी डाळी तसेच बेसण, गूळ, पाक, तांदूळ, जिरे, घाण्याचे करडई, शेंगदाणा तेल आदी शेतमाल तसेच प्रक्रिया उत्पादनांची वसमत शहरात ग्राहकांना घरपोच विक्री केली जाते.

‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता सध्या ‘कोरोना’चा संर्सग रोखण्यासाठी संचार बंदी लागू आहे. त्यामुळे वसमत शहरातील ग्राहकांना आठवड्यातून एक दिवस भाजीपाला तसेच अन्य उत्पादने पिशव्यामध्ये भरुन पोच केली जातात. तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधलेला असतो. सोबत सॅनीटायझर असते. एक दोन घरे झाले की सॅनिटायझरचे हात निर्जंतूक केले जातात. घरी आल्यानंतर परत हात निर्जंतुक केले जातात. ग्राहकांच्या घरी भाजीपाला देतांना योग्य अंतर राखले जाते. एका टोपलीमध्ये मागणी केलेला संपूर्ण भाजीपाला टाकला जातो. सध्या चलनी नोटाचा कमीकमीत वापर केला जात आहे. फोन पे, गूगल पे आदीव्दारे आॅनलाईन पेमेटवर भर आहे, असे दादाराव राऊत यांनी सांगितले.

संपर्क क्रमांक - दादाराव राऊत ः 9960686171  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT