एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रावर जप्तीची कारवाई टळली 
मुख्य बातम्या

एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रावर जप्तीची कारवाई टळली

टीम अॅग्रोवन

एकलहरे, जि. नाशिक  : गेल्या दोन वर्षांपासून वीज केंद्राने ग्रामपंचायतीची २ कोटी १५ लक्ष घरपट्टी थकवल्याने अखेर एकलहरे ग्रामपंचायतीने कायदेशीर मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली होती. १७ मार्चपर्यंत घरपट्टी भरली नाही तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानानुसार वीजनिर्मिती केंद्राची मालमत्ता कुठल्याही क्षणी जप्त करण्याचा इशारा देण्यात आलेला होता. औष्णिक वीज केंद्राने थकीत घरपट्टी पैकी एक कोटी तीन लाख ५८ हजारांचा धनादेश दिल्याने एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रावर जप्तीची कारवाई टळली आहे. घरपट्टीचा कर जमा झाल्याने येथील गांव, सिद्धार्थ नगर, गंगावाडी परिसराचा कायापालट होण्यास व विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. वीजनिर्मिती केंद्राकडे २०१८-१९ व २०१९-२० या वर्षांची घरपट्टीपोटी २ कोटी १५ लाख रुपयांची थकबाकी मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीने कंपनीला वारंवार विनंत्या व अर्ज करूनही दुर्लक्ष केले जात होते. यासाठी प्रकाशगड मुंबई येथील मुख्य कार्यालयातही पत्रव्यवहार केला गेला होता, अखेर एकलहरे ग्रामपंचायतीने थकीत वसुली मिळावी यासाठी २ मार्च २०२० रोजी कायदेशीर मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविली. त्यानंतर महानिर्मिती कंपनीने मालमत्ता जप्तीची नामुष्की टळावी यासाठी ५ मार्च २०२० रोजी १ कोटी ३ लाख ५८ हजार ७७६ रुपयांचा धनादेश एकलहरे ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे. उर्वरित रकमेसाठी कंपनी जिल्हा परिषदेकडे दाद मागणार असून जिल्हा परिषद याबाबतीत जो निर्णय घेईल त्यानुसार ग्रामपंचायतीला रक्कम अदा करण्यात येणार असल्याचे ''महाजेनको'' कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे.  

ग्रामपंचायतीच्या उत्पनाचा महत्त्वाचा मार्ग नाशिक औष्णिक वीज केंद्र असून वीज कंपनीने गेल्या दोन वर्षांपासून घरपट्टीची रक्कम थकविली होती, उशिरा का होईना वीज कंपनीला थकबाकी देण्याची जाग आली, दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीची जी विकास कामे थांबली होती, ती मार्गी लागण्यास मदत होईल. - मोहिनी जाधव, सरपंच, एकलहरे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT